प्रतिनिधी
नागपूर : अण्णा हजारेंच्या मनातला कायदा शिंदे फडणवीस सरकार आणणार आहे. महाराष्ट्रात लोकायुक्त नेमणार आहे. Law in the Mind of Anna Hazare; Chief Minister will be brought under the jurisdiction of Lokayukta
लोकायुक्त विधेयक याच हिवाळी अधिवेशनात आणणार. लोकायुक्तांच्या कक्षेत मुख्यमंत्रीपदालाही आणण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यापैकी पहिल्या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राज्य मंत्रिमंडळाने आगामी हिवाळी अधिवेशनात लोकायुक्त नेमणूकीचा कायदा लागू करण्यासाठी पुढचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. लोकायुक्त कायद्याचे विधेयक विधी मंडळात मांडलं जाणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी राज्य सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवरही निशाणा साधला.
“आताच मंत्रिमंडळाची बैठक आम्ही घेतली. दोन महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलीय. त्याबद्दल ते सविस्तर सांगतीलच. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सातत्याने मागणी करत होते की, ज्याप्रकारे केंद्रात लोकपालाचं विधेयक झालं तसं महाराष्ट्रात लोकपाल आणि लोकायुक्ताचा कायदा झाला पाहिजे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
“या संदर्भात मागच्या काळात भाजप-सेना युतीचं सरकार होतं त्यावेळी एक समिती आपण स्थापन केली होती. ती समिती माहिती देणार होती. मधल्या काळात त्यावर फार काही गंभीर काम झालेलं दिसत नाही. पण आता नवीन सरकार आल्यापासून आम्ही त्या समितीला चालना दिली”, असा दावा फडणवीसांनी केला.
“अण्णा हजारे यांच्या समितीने दिलेला रिपोर्ट पूर्णपणे शासनाने स्वीकारलाय. त्यानुसार लोकायुक्त कायदा तयार करण्याच्या विधेयकाला आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आमच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे”, अशी माहिती फडणवीसांनी दिली.
“आता याच अधिवेशनात नवीन लोकायुक्ताचं विधेयक मांडणार आहोत. पहिल्यांदाच महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनासुद्धा लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्याचं काम होणार आहे. या कायद्यात भ्रष्टाचार विरोधी कायदा समाविष्ट करण्यात येईल. लोकायुक्त हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाचे न्यायधीश या दर्जाचे असतील”, अशी देखील माहिती त्यांनी दिली.
हम पूरी पारदर्शिता के साथ सरकार चलाएंगे। हम महाराष्ट्र को भ्रष्टाचार मुक्त बनाएंगे, इसलिए हमने राज्य में लोकायुक्त कानून लाने का फैसला किया है: महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे pic.twitter.com/T8WpLhBVzx — ANI_HindiNews (@AHindinews) December 18, 2022
हम पूरी पारदर्शिता के साथ सरकार चलाएंगे। हम महाराष्ट्र को भ्रष्टाचार मुक्त बनाएंगे, इसलिए हमने राज्य में लोकायुक्त कानून लाने का फैसला किया है: महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे pic.twitter.com/T8WpLhBVzx
— ANI_HindiNews (@AHindinews) December 18, 2022
लोकायुक्त बिल इसी सत्र में लाया जाएगा। अन्ना हजारे ने मांग की थी कि राज्य में अधिकारिता प्राप्त करने वाला लोकायुक्त का कानून आना चाहिए। हमने अन्ना हजारे की कमेटी बनाई थी, जो सिफारिश दी है उसको स्वीकारा है और ये कानून तैयार किया है: महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस pic.twitter.com/azMiJIP5VL — ANI_HindiNews (@AHindinews) December 18, 2022
लोकायुक्त बिल इसी सत्र में लाया जाएगा। अन्ना हजारे ने मांग की थी कि राज्य में अधिकारिता प्राप्त करने वाला लोकायुक्त का कानून आना चाहिए। हमने अन्ना हजारे की कमेटी बनाई थी, जो सिफारिश दी है उसको स्वीकारा है और ये कानून तैयार किया है: महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस pic.twitter.com/azMiJIP5VL
देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा
“मला आज अतिशय आनंद वाटला की, अजित दादांना विदर्भाची आठवण आली. मुंबईत कोरोना नव्हता त्यामुळे अधिवेशन व्हायचं आणि नागपुरात कोरोना होता म्हणून अधिवेशन होत नव्हतं, अशी विडंबना आपण मागच्या काळात बघितलीय”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
“अन्यायाची मालिका ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुरु झाली”, अशी खोचक टीका फडणवीसांनी केली.
“महापुरुषांच्या अपमानाबद्दल त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. मला आश्चर्य वाटतं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावा मागणारे हे मांडीला मांडी लावून बसतात आणि महापुरुषाच्या अपमानाबद्दल बोलतात. वारकरी संतांबद्दल अतिशय हीन दर्जाने बोललं जातं. त्यांना मंचावर घेऊन हे महापुरुषांच्या अपमानाबद्दल बोलतात”, असा टोला त्यांनी लगावली.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला हे देखील मान्य नाही. या संदर्भात बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाहीय. महापुरुषांचा अपमान कुणीही करु नये. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. पण त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर त्याला योग्य उत्तर द्यायला तयार आहोत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सीमावादावरुन विरोधकांवर निशाणा
“हे सरकार आल्यानंतरच जणू काही सीमावाद सुरु झाला, अशाप्रकारे बोललं जातंय. खरंतर जतच्या गावांनी आम्हाला कर्नाटक जायचंय असा ठराव 2013 साली केला, जेव्हा यांचं सरकार होतं तेव्हा केलं होतं. त्यानंतर 2016 साली 77 गावांना आपण पाहोचवलं. आणि उर्वरित गावांना पाणी पोहोचवण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App