लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांची खासदारकी अडचणीत? जात वैधता प्रमाणपत्राबाबत न्यायालयात याचिका दाखल

विशेष प्रतिनिधी

लातूर : लातूरचे खासदार शिवाजी काळगे यांची खासदारकी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील योगेश उदगीरकर यांनी याबाबत न्यायालयात धाव घेतली आहे.Latur MP Dr. Shivaji Kalge’s MP in trouble? Petition filed in court regarding caste validity certificate

काय म्हणाले याचिकाकर्ते?

याचिकाकर्ते उदगीरकर म्हणाले, लोकसभेचा निकाल लागून 46 दिवस उलटले. 45 दिवसांची हायकोर्टाची इलेक्शन पीटिशन दाखल करण्याची मुदत होती, ती संपलेली आहे. लातूरचे निवडून आलेले उमेदवार काळगे यांच्याविरोधात आम्ही परवा रिट पीटीशन दाखल केली आहे. आपण त्यांच्याविरोधात दोन केसेस दाखल केलेल्या आहेत. आपण त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राला चॅलेंज केलेलं आहे. दुसरं म्हणजे इलेक्शन पीटीशनही आपण दाखल केलेली आहे, असं योगेश उदगीरकर म्हणाले.



शिवाजी काळगे यांनी 1986 साली जात प्रमाणपत्र काढलं होतं

पुढे बोलताना योगेश उदगीरकर यांनी सांगितले की, शिवाजी काळगे यांनी 1986 साली जात प्रमाणपत्र काढलं होतं, ते औरंगाबादच्या आयुक्तांनी रद्द केलं. त्यांनी त्याठिकाणी सांगितलं की दिनांक 5 डिसेंबर 1985 अन्वये संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी.

म्हणजेच ज्यांनी त्यांचं जात प्रमाण काढणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, असं आयुक्तांनी म्हटलं होतं. त्यानंतर महाराष्ट्र शासनानेही त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं होतं.

Latur MP Dr. Shivaji Kalge’s MP in trouble? Petition filed in court regarding caste validity certificate

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात