विशेष प्रतिनिधी
Lalbaugcha Raja गणेशोत्सवाच्या उत्साहातच मुंबईतून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. लालबाग च्या राजाच्या विसर्जन मिरवणूकी दरम्यान एका अज्ञात वाहनाने दोन चिमुकल्यांना चिरडले. या अपघातात चंद्रा वजणदार (वय 2) या बालिकेचा मृत्यू झाला, तर तिचा भाऊ शैलू वजणदार (वय 11) गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर परळ येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.Lalbaugcha Raja
शनिवारी पहाटे 3 ते 4 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. लालबाग राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर दोन्ही भावंडं झोपली होती. त्याचवेळी एका अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले आणि कोणतीही मदत न करता चालक घटनास्थळावरून पळून गेला. या प्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.Lalbaugcha Raja
चालक झाला फरार
मिळालेली अधिक माहिती अशी की, हा घटना पहाटे अंदाजे चारच्या दरम्यान घडली. ही दोन्ही मुले रस्त्याच्या कडेला झोपली होती. भरधाव येणाऱ्या वाहनचालकाने थेट या मुलांच्या अंगावर गाडी घातली. त्यानंतर तिथे मदत न करता त्या वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. लालबाग राजाच्या मिरवणुकीची तयारी सुरू असल्याने लोकांची मोठी गर्दी तिथे होती. अनेकांनी पुढे येत या दोन चिमुकल्यांना केईएम रुग्णालयात दाखल केले. सध्या मुलावर उपचार सुरू आहेत. पोलिस या अपघातप्रकरणी अधिकचा तपास करताना दिसत आहेत.
दरम्यान, लालबाग च्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात झाली. लालबाग मार्केट, चिंचपोकळी स्टेशन आणि भायखळ्यातील हिंदुस्तान मशिदीतून बाप्पाचे स्वागत करत ही मिरवणूक गिरगाव चौपाटीवर पोहोचली. पहाटेच्या वेळी ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात राजाचे विसर्जन करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App