जास्मिन वानखेडे या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या सदस्य असल्याने त्यासुद्धा या पत्रकार परिषदेत सहभागी झाल्या होत्या.Lady Dawn’s retaliation against Nawab Malik; Said – Shall we send bangles as a gift?
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीवर आणि एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर ठराविक लोकांना लक्ष्य करत असल्याचे आरोप केले होते. या प्रकरणात त्यांनी समीर वानखेडे यांच्या बहिण जास्मिन वानखेडे यांना लेडी डॉन म्हणत त्यांच्यावरही अनेक आरोप केले होते. या आरोपांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने आता पत्रकार परिषद घेत आपली बाजू स्पष्ट केली आहे. जास्मिन वानखेडे या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या सदस्य असल्याने त्यासुद्धा या पत्रकार परिषदेत सहभागी झाल्या होत्या. मनचिसेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि सचिव शर्मिला ठाकरे यांनीही नवाब निशाणा साधला आहे.
जस्मीम वानखेडे म्हणाल्या की, मलिक जी तुम्ही ज्या पोझिशनला आहेत त्याबाबत तुम्हाला शोभत नाही. आम्ही काम करणारे लोक आहे. मी वकील आहे, तुम्हाला लाज नाही वाटत, मी तुम्हाला बांगड्या पाठवू का? कुर्ला परिसरात काही तरी करा, महिलांसाठी काही चांगली काम करा. तुम्ही कोणालाही डॉन बोलतात. मी काय करते.. काय अनधिकृत करते की तुम्ही मली डॉन बोलत आहात, असा सवालही जास्मिन यांनी उपस्थित केला आहे.
नवाब मलिक यांनी माझ्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जाऊन स्टॉकिंग केलं. माझे पर्सनल फोटो हे त्यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केले. हे त्यांना शोभत नाही. महिलांचा आदर ठेवायला शिका असं म्हणत जास्मिन वानखेडे यांनी नवाब मलिक यांना खडे बोल सुनावले आहेत.
एका प्रामाणिक ऑफिसरवर तुम्ही संशय घेत आहात ही बाब योग्य नाही. समीर वानखेडे चांगलं काम करत आहे त्यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. एवढंच नाही तर नवाब मलिक हे मला लेडी डॉन म्हणतात. कुठल्या पुराव्यांनिशी त्यांनी माझ्यावर हा आरोप केला आहे? मी एक वकील आहे आणि माझ्यावर त्यांनी हे बिनबुडाचे आरोप केले आहेत. या आरोपांना काहीही अर्थ नाही असंही आज जास्मिन वानखेडे यांनी सांगितलं.
”कॅबिनेट मंत्री असं अनव्हेरिफाईट स्टेटमेंट देत आहेत. काही स्टेटमेंट देण्यापूर्वी त्यांनी विचार करावा. माझा भाऊ योग्य कारवाई करत आहे. मी मनसे चित्रपटच सेनेत उपाध्यक्ष आहे आणि कायदेशीर काम पाहते. माझ्या राजकीय स्टेटसचा आणि माझ्या कामाचा त्यांनी आदर करायला हवा. समाजाला ते चुकीची प्रेरणा देत आहेत, त्यांना हे समजायला हवं. पुरावे द्या आणि मग बोला, असं आव्हान जास्मिन वानखेडे यांनी मलिकांना दिल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App