विशेष प्रतिनिधी
विशेष प्रतिनिधी: Chhagan Bhujbal राज्यातील गरीब व गरजू कुटुंबांना गणेशोत्सव, दिवाळी, आणि इतर सणांमध्ये मिळणाऱ्या ‘आनंदाचा शिधा’ योजनेला यंदा ब्रेक लागणार आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे की, ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी ४५,००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्यामुळे आनंदाचा शिधा पुरवणे यंदा शक्य होणार नाही.Chhagan Bhujbal
आनंदाचा शिधा योजनेत १०० रुपयांत गरजूंना साखर, रवा, चणाडाळ आणि पामतेल असे चार जीवनावश्यक वस्तूंचे पॅकेज सणासुदीच्या काळात देण्यात येत होते. मात्र, यंदा राज्य सरकारच्या आर्थिक नियोजनात मोठा बदल झाला आहे.Chhagan Bhujbal
राज्य सरकारने महिला सशक्तीकरणासाठी ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केली असून त्यासाठी दरवर्षी ४५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत. त्यामुळे इतर सामाजिक योजनांवर, विशेषतः सणासुदीच्या काळात दिल्या जाणाऱ्या आनंदाच्या शिध्यावर परिणाम झाल्याचे भुजबळ यांनी मान्य केलं.
“आनंदाचा शिधा देण्यासाठी दोन ते तीन महिने आधी निविदा प्रक्रिया (टेंडर) सुरू करावी लागते. परंतु सध्या वेळ आणि निधी दोन्ही उपलब्ध नाहीत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी आनंदाचा शिधा देता येणार नाही,” असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.
भुजबळ यांनी सांगितले की, “राज्य सरकारकडून दरवर्षी शिवभोजन थाळीसाठी १४० कोटी, तर आनंदाचा शिधा योजनेसाठी ५५० कोटी रुपये खर्च होत होते. सध्या आम्ही महसूल वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करत आहोत. निधी उपलब्ध होताच, गरजूंना मदत सुरूच राहील.”
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आनंदाचा शिधा ही योजना सुरू करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App