विशेष प्रतिनिधी
पुणे : Kundeshwar जिल्ह्यातील राजगुरूनगर तालुक्यातील कुंडेश्वर येथे आज दुपारी एक भीषण अपघात झाला. महादेवाच्या दर्शनासाठी निघालेली भाविकांची पिकअप व्हॅन भरधाव वेगात दरीत कोसळली. या अपघातात 9 महिला भाविकांचा मृत्यू झाला असून 35 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांपैकी 7 जणींचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोन महिलांनी रुग्णालयात नेताना प्राण सोडले.Kundeshwar
श्रावणी सोमवारच्या दर्शनयात्रेत दुर्दैवी घटना
ही घटना पाईट गावाजवळ घडली. श्रावणी सोमवारनिमित्त सकाळी अकराच्या सुमारास भाविकांची व्हॅन कुंडेश्वरकडे जात होती. घाट चढताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते खोल दरीत कोसळले. वाहनाने सलग पाच-सहा पलट्या खाल्ल्या. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. 10 पेक्षा अधिक ॲम्ब्युलन्स आणि खासगी वाहनांच्या मदतीने जखमींना पाईट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना मोठ्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे.Kundeshwar
अपघात इतका भीषण होता की मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेतील मृत आणि जखमी पापळवाडी गावातील असल्याचे समजते. मदतीसाठी मोठ्या संख्येने स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यामुळे अनेकांना वेळेत उपचार मिळाले.
महाराष्ट्रात पुणे येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीमुळे दुःख झाले आहे. या दुर्घटनेत आपले जिवलग गमावलेल्या सर्वांप्रति शोकसंवेदना. जखमी लवकर बरे होवोत अशी प्रार्थना. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी-PMNRF मधून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये दिले जातील. जखमींना प्रत्येकी… — PMO India (@PMOIndia) August 11, 2025
महाराष्ट्रात पुणे येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीमुळे दुःख झाले आहे. या दुर्घटनेत आपले जिवलग गमावलेल्या सर्वांप्रति शोकसंवेदना. जखमी लवकर बरे होवोत अशी प्रार्थना.
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी-PMNRF मधून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये दिले जातील. जखमींना प्रत्येकी…
— PMO India (@PMOIndia) August 11, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले असून, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. पीएमओने ट्विट करून सर्व जखमी लवकर बरे होवोत, अशी प्रार्थना केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App