नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून जे आरोप कऱण्यास सुरूवात केली आहे, त्याबाबत ही भेट घेतली जाणार आहे.Kranti Redkar and Dnyaneshwar Wankhede to meet Governor Bhagat Singh Koshyari, complain about allegations made by Nawab Malik
विशेष प्रतिनिधी
मुंबई : समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकर आणि समीर वानखेडेंचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे हे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेणार आहेत. नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून जे आरोप कऱण्यास सुरूवात केली आहे, त्याबाबत ही भेट घेतली जाणार आहे.
क्रांती रेडकर वारंवार सांगत आहेत की , नवाब मलिक हे आपल्या कुटुंबाची नाहक बदनामी करत आहेत . इतकंच नाही तर आपण धर्म बदललेला नाही हे ज्ञानेश्वर वानखेडेंनी सगळी कागदपत्रं दाखवूनही सांगितलं आहे. तरीही नवाब मलिक यांनी आरोप थांबवले नाहीत म्हणून ही भेट घेतली जाणार आहे असं समजतं आहे.
नेमकं नवाब मलिक काय म्हणाले
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी क्रूझ पार्टी प्रकरणात आर्यन खानला अटक केल्यापासून ही सगळी कारवाई म्हणजे बनाव आहे असा आरोप केला आहे. तसंच समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत असंही त्यांनी वारंवार सांगितलं.तसेच २००७ मध्ये त्यांनी एका मुस्लिम मुलीशी विवाह केला होता. नंतर तिला तलाक दिलाय . तसंच त्यांनी समीर वानखेडे यांचा समीर दाऊद वानखेडे असा उल्लेख केला होता.
दरम्यान यानंतर क्रांती रेडकर आणि ज्ञानेश्वर वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिकांचे आरोप खोडले होते. आता आज याच प्रकरणी क्रांती रेडकर आणि ज्ञानेश्वर वानखेडे हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App