कोयना धरणाचे दरवाजे दुसऱ्यांदा उघडले, सहा वक्री दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरु

वृत्तसंस्था

कराड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसापासून पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत धरणाचे सहा वक्री दरवाजे दुसऱ्यांदा उघडले आहे दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. Koyna Dam Management Said Water released from six doors of dam; issue alert to peoples

कोयना धरणातील पाणीसाठा नियमनासाठी धरणाचे सहाही वक्री दरवाजे दुसऱ्यांदा एक फुटाने उचलून कोयना नदीपात्रात ९ हजार क्युसेक तर पायथ्या वीजगृह मधून हजार क्यूसेक असा एकूण दहा हजार क्युसेक पाणी विसर्ग सुरु केला आहे. १०५ टीएमसी पाणी साठवण क्षमतेच्या कोयना धरणात १०३ टीएमसी पाणीसाठा आहे.

पाणी सोडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणात पाण्याची आवक वाढल्यास दरवाजे आणखी उचलेले जाणार आहेत, अशी माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे.

कराड, सांगलीकरांची चिंता वाढणार?

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यानंतर कोयना नदीकाठच्या गावांसह कराड आणि सांगलीत देखील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. तेथील नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

Koyna Dam Management Said Water released from six doors of dam; issue alert to peoples

महत्त्वाच्या बातम्या.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात