विशेष प्रतिनिधी
पुणे -नवीन वाहन खरेदी करताना दाेन हेल्मेट देणे बंधनकारक असताना, ग्राहकास दाेन हेल्मेट न देता फसवणुक केल्याप्रकरणी पाैड रस्त्यावरील नामांकित द शेलार अॅटाेमीटीव्ह या दुचाकी विक्रेत्या शाेरुमचे मालक, मॅनेजर व मंजुनाथ यांचे विराेधात काेथरुड पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Kothrud doctor complaint against the shelar automotive because they not provided two helmets with new buying Vehical
याबाबत डाॅ.अभिषेक सुभाष हरीदास (वय-३९,रा.काेथरुड,पुणे) यांनी पाेलीसांकडे तक्रार दिली आहे. डाॅ.अभिषेक हरीदास यांनी शेलार अाॅटाेमीटीव्ह मधून राखाडी रंगाची टीव्हीएस (एमएच १२ युबी ४१८३) ही दुचाकी खरेदी केली. सदर ज्युपीटर कंपनीचे
रिजस्ट्रेशन आरटीओकडे करुनही त्यांनी नवीन वाहना साेबत हेल्मेट न दिल्याने त्यांनी विश्वासघात करुन फसवणुक केल्याची तक्रार पाेलीसांना प्राप्त झाली आहे. याबाबत काेथरुड पाेलीस ठाण्याचे पाेलीस पुढील तपास करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App