विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान प्रक्षुब्ध वातावरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ब्राह्मण समाजाला 3 मिनिटात संपवण्याची धमक्यांची भाषा करणारा मुख्य आरोपी किंचक नवले याला पोलिसांनी आज साताऱ्यामधून अटक केली. त्याला कोर्टासमोर हजर केल्यानंतर कोर्टाने त्याला 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.Kinchak Navale arrested for threatening to kill Brahmins + Fadnavis in 3 minutes; Absconded by disguise!!
Mumbai: Santacruz Police has arrested a 34-year-old man named Kinchak Navale from Satara for making life-threatening and derogatory remarks against Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis. This is the second arrest in the case. The accused was produced in court after… — ANI (@ANI) March 3, 2024
Mumbai: Santacruz Police has arrested a 34-year-old man named Kinchak Navale from Satara for making life-threatening and derogatory remarks against Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis. This is the second arrest in the case. The accused was produced in court after…
— ANI (@ANI) March 3, 2024
मराठा आरक्षण आंदोलनातील प्रक्षुब्ध वातावरणात सगळा ब्राह्मण समाज आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 3 मिनिटात संपवू, अशी धमकी भरली भाषा किंचक नवलेने वापरली होती. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर राज्यभरात त्याचे गंभीर पडसाद उमटले. पोलिसांनी किंचक नवलेला आयडेंटिफाय करून त्याचा शोध सुरू केला होता. पोलीस आता आपल्याला सोडणार नाहीत. आपल्यावर कठोर कायदेशीर कारवाई होणार या भीतीने किंचक नवले वेशांतर करून फरार झाला होता. वेषांतर करून तो वारंवार राहण्याच्या जागा बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. किंचक नवलेचा धमक्यांचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या योगेश सावंतला पोलिसांनी आधीच अटक केली. त्याच्या अटकेमुळे अधिकच घाबरलेला किंचक नवले साताऱ्यातूनही फरार होण्याच्या बेतात होता. परंतु सांताक्रुज पोलिसांनी त्याचे धागेदोरे शोधून काढत सातारा पोलिसांच्या मदतीने चपळाईने कारवाई करत त्याला साताऱ्याच्या सदर बाजार परिसरातून अटक केली.
हा व्हिडीओ आपल्या ‘एक्स’ हँडल म्हणजेच पूर्वीच ट्विटरवरून व्हायरल केल्याप्रकरणी योगेश सावंत याला याआधीच अटक करण्यात आली आहे. योगेश हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष आहे. त्यालाही 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App