राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचे वितरण
विशेष प्रतिनिधी
पुणे : ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन १५ जानेवारी हा दिवस महाराष्ट्राचा ‘राज्य क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. Khashaba Jadhavs birthday will be celebrated as State Sports Day of Maharashtra Eknath Shinde announced
सन २०१९-२०, सन २०२०- २१ व सन २०२१-२२ या वर्षासाठी देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, खेळाडू पुरस्कार, एकलव्य खेळाडू पुरस्कार (दिव्यांग खेळाडू), साहसी क्रीडा पुरस्कार व जिजामाता पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. एकूण ११९ खेळाडू आणि प्रशिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. श्रीकांत शरदचंद्र वाड यांना सन २०१९-२० या वर्षाचा तर दिलीप बळवंत वेंगसरकर यांना सन २०२०-२१ या वर्षाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्र खेळाला प्रोत्साहन देणारे देशतील अग्रेसर राज्य आहे. त्यामुळे खेळात महाराष्ट्राने घवघवीत यश मिळवले आहे. चौथ्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत ५६ सुवर्ण पदकांसह एकूण १६१ पदके मिळवून तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ३९ पदकांसह १४० पदके मिळवून महाराष्ट्राने अव्वल कामगिरी केली आहे.
याचबरोबर राष्ट्रकुल स्पर्धेतही आपल्या खेळाडूंनी यश मिळवले. ऑलिम्पिकमध्येही चांगले यश मिळावे यासाठी सर्व सहकार्य करू. खेळाडूंनी राज्याचा लौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर असाच उंचवावा, असे आवाहन करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.
ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू स्व.खाशाबा जाधव यांचा जन्मदिन १५ जानेवारी हा दिवस 'महाराष्ट्राचा राज्य क्रीडा दिन' म्हणून साजरा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी यावेळी केली. महाराष्ट्र खेळाला प्रोत्साहन देणारे देशतील अग्रेसर राज्य आहे. त्यामुळे खेळात… pic.twitter.com/QpPrRcFaOy — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 28, 2023
ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू स्व.खाशाबा जाधव यांचा जन्मदिन १५ जानेवारी हा दिवस 'महाराष्ट्राचा राज्य क्रीडा दिन' म्हणून साजरा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी यावेळी केली.
महाराष्ट्र खेळाला प्रोत्साहन देणारे देशतील अग्रेसर राज्य आहे. त्यामुळे खेळात… pic.twitter.com/QpPrRcFaOy
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 28, 2023
बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमास सहकार मंत्री दिलीप वळसे- पाटील, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, ग्राम विकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन आणि मान्यवर उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App