विशेष प्रतिनिधी
मुंबई: Khalid Ka Shivaji ‘खालिद का शिवाजी’ हा मराठी चित्रपट प्रदर्शनापूर्वीच जोरदार वादात अडकला आहे. ८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर काही सामाजिक संघटनांकडून त्यातील मजकुरावर आक्षेप घेण्यात आला असून, हिंदू महासभेने चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत सेन्सॉर बोर्ड आणि निर्मात्यांना पत्रही दिले आहे.Khalid Ka Shivaji
या चित्रपटाची कथा एका मुस्लीम शाळकरी विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांच्या जीवनमूल्यांचा शोध घेणारी आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राज प्रितम मोरे यांनी केले असून, पटकथा कैलास वाघमारे यांनी लिहिली आहे. प्रियदर्शन जाधव, सुषमा देशपांडे, भारत गणेशपुरे, स्नेहलता तागडे आणि क्रिश मोरे यांसारखे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.Khalid Ka Shivaji
चित्रपटात करण्यात आलेल्या काही दाव्यांवरून वाद निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात ३५% मुस्लीम होते. त्यांचे ११ अंगरक्षक मुस्लीम होते, रायगडावर शिवाजी महाराजांनी मशीद बांधली होती असे काही संदर्भ चित्रपटात मांडले गेले असून, हे ऐतिहासिकदृष्ट्या अपूर्ण आणि विकृत दावे असल्याचा आरोप हिंदू महासभा आणि काही हिंदुत्ववादी नेत्यांकडून केला जात आहे.
हिंदू महासभेचे आनंद दवे यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना म्हटले की, “शिवाजी महाराजांना धर्मनिरपेक्ष दाखवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न केला जात आहे. हे विकृतीकरण आहे.”
महंत सुधीरदास महाराजांनी याकडे लक्ष वेधून सांगितले की,”या दाव्यांना कोणतेही ऐतिहासिक संदर्भ किंवा पुरावे जोडलेले नाहीत. त्यामुळे अशा माहितीवर आधारित चित्रपटाला सेन्सॉरने परवानगी देऊ नये.”
हिंदू महासभेने चित्रपट निर्मात्यांना आणि सेन्सॉर बोर्डाला लिखित निवेदन पाठवले असून, चित्रपटावर त्वरित बंदी घालण्याची मागणी केली आहे.”‘खालिद का शिवाजी’ हेच शीर्षक चुकीचे आणि भ्रामक आहे,” असे दवे व महंतांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App