उन्हाळा आला की पुणेकरांवर नेहमी पाणी कपातीची टांगती तलवार असते. पुण्याला ११ टीएमसी पाण्याची गरज वर्षाची असते. मात्र, शेतीसाठी आणि ग्रामीण भागालाही या धरणसाखळीतून पाणी देण्याचे नियोजन असते. मात्र, यंदा धरणसाखळीत मुबलक पाणीसाठा आहे. हे पाणी ३१ जुनपर्यंत पुरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे – उन्हाळा आला की पुणेकरांवर नेहमी पाणी कपातीची टांगती तलवार असते. पुण्याला ११ टीएमसी पाण्याची गरज वर्षाची असते. मात्र, शेतीसाठी आणि ग्रामीण भागालाही या धरणसाखळीतून पाणी देण्याचे नियोजन असते. मात्र, यंदा धरणसाखळीत मुबलक पाणीसाठा आहे. हे पाणी ३१ जुनपर्यंत पुरवण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाचे असल्याने खडकवासला धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंगा विजय पाटील यांनी सांगितले. त्यामुळे यंदा पुणेकरांना पाण्याची चिंता असणार नाही.Khadakwasla dam sufficient water storage punekar public not worry about water shortage in summer
खडकवासला धरण साखळीतून पुण्याला आणि ग्रामीण भागाला पाणी पुरवठा केला जातो. शेतीसाठी सुरु असलेल्या आणि शहराला होणा-या पाणी पुरवठ्यामुळे धरणातील पाणी झपाटट्याने कमी झालेआहे. या प्रकल्पात चार धरणे आहेत. या धरणात १२.५० टीमसी (४६ टक्के) पाणी साठा सध्याच्या स्थितीत आहे. पुण्याला दररोज ४ हजार ६६० एमएलडी पाणी पुरवण्यात येते. जुलै महिन्याच्या १५ तारखेपर्यंत हे पाणी दिले जाते. यंदा ३१ जुलै पर्यंत पाणी पुरेल येवढे पाणी आहे.
खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर ही धरणे येतात. या चारही धरणांची क्षमता २९.१५ टीएमसी आहे. पाटबंधारे विभाग व पुणे महानगरपालिका यांच्यामध्ये १९९७ मध्ये झालेल्या एका करारानुसार पुणे महापालिकेने ६ टीएमसी सांडपाणी मुळा मूठा नदीतून उचलून मुंढवा येथे या पाण्यावर प्रक्रिया करायची. नंतर हे पाणी जुन्या मूठा उजव्या कालव्यामधून शेतीला पाणी पुरवठा करायचा, असे नियोजन असते
सध्या मुठा उजव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुरू आहे. हे आवर्तन एक ते सव्वा महिन्यानंतर बंद करण्यात येणार आहे. टेमघर धरणांत ०.४८ टीएमसी (१२.९८ टक्के), वरसगाव धरणात ६.४० टीएमसी (४९.९३ टक्के), पानशेतमध्ये ५.७७ (५४.१८ टक्के) टीएमसी तर खडकवासला धरणामध्ये ०.८५ (४२.८४ टक्के) टीएमसी असा चारही धरणांत मिळून एकूण १३.५० अब्ज घनफूट (टीएमसी) ४६. ३० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
गेलया वर्षी याच दिवशी १५.१८ टीएमसी पाणीसाठा होता. त्यामुळे पाणी कपात टाळायची असेल तर या पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. धरणसाखळीतील पाणीसाठा कमी असला तरी शेतीसाठी २ आवर्तने देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे कार्यकारी अभियंता पाटील म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App