‘’ज्या मातोश्रीच्या प्रवेशद्वारावरून भास्कर जाधवांना अपमानित करून हाकलून दिले गेले, त्याच उद्धव ठाकरेंची…’’ भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर!

bhaskar jadhav and Keshav Upadhye

‘’मंत्रीपद मिळवण्यासाठी बावनकुळेंना भास्कर जाधवांसारखी पक्षांतरे करावी लागली नव्हती.’’ असंही केशव उपाध्येंनी म्हटलं आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी जाहीर कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळेंच्या रंग, रुपावरून अपमानस्पद टिप्पणी केली होती. यावर भाजपाकडून भास्कर जाधवांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. Keshav Upadhyae response to Bhaskar Jadhav criticism of BJP state president Chandrasekhar Bawankule

भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, ‘’भास्कर जाधव, भारतीयांना रंगावरून हिणवणाऱ्या गोऱ्या कातडीच्या ब्रिटिशांनाही भारतीयांनी घालवले आहे, तुम्ही कोण लागलात?  ब्रिटिशांनी भारतीयांना गोऱ्या कातडीच्या अहंकारातून हिणवले, भारतीयांना कृष्णवर्णावरून अपमानित केले. उद्धव ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांनी ब्रिटिशांच्या याच मानसिकतेतून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रंगावरून, त्यांच्या दिसण्यावरून अपमानास्पद शेरेबाजी केली आहे. भास्कर जाधव, रंग, रूप माणसाच्या हातात नसतं. माणसाचं रूप नाही तर कर्तृत्व बघावं. अत्यंत सामान्य परिस्थितीतून बावनकुळे यांनी आपल्या कष्टाच्या, मेहनतीच्या जोरावर राजकारणात महत्वाची पदे भूषवली आहेत.’’

याचबरोबर ‘’मंत्रीपद मिळवण्यासाठी बावनकुळेंना भास्कर जाधवांसारखी पक्षांतरे करावी लागली नव्हती. ज्या मातोश्रीच्या प्रवेशद्वारावरून भास्कर जाधवांना अपमानित करून हाकलून दिले गेले त्याच उद्धव ठाकरेंची भास्कर जाधवांना आरती करावी लागते आहे. या उद्धव ठाकरेंना आपले आमदार सांभाळता न आल्याने त्यांची हिट विकेट कशी गेली, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. रंग, रूपाचा माज करू नका. ब्रिटनचा सध्याचा पंतप्रधान भारतीय वंशाचा आहे, हे लक्षात ठेवा. अमेरिकेलाही बराक ओबामा यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वीकारावे लागले होते. राजकारणात टीका जरूर करावी पण एखाद्याच्या रंग रुपावरुन टीका करून भास्कर जाधवांनी आपली ब्रिटिश मानसिकता दाखवून दिली आहे.’’ असंही केशव उपाध्येंनी म्हटलं आहे.

याशिवाय ‘’वर्ण, जात विसरून विठ्ठलभक्तीची शिकवण महाराष्ट्राच्या भागवत धर्माने दिली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ” वर्णअभिमान विसरली याती एकएकां लोटांगणीं जाती निर्मळ चित्तें जालीं नवनीतें पाषाणा पाझर सुटती रे ” भास्कर जाधवांनी बावनकुळे यांच्या रंगावरून शेरेबाजी करून भागवत धर्माचाच अपमान केला आहे.’’ असा आरोपही केशव उपाध्येंनी म्हटलं आहे.

Keshav Upadhyae response to Bhaskar Jadhav criticism of BJP state president Chandrasekhar Bawankule

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात