‘’ब्राह्मण समाजाने कधीही देश, देव, धर्म, संस्कार, संस्कृतीच्या विरोधात मतदान केलं नाही.’’, असंही म्हणाले आहेत.
प्रतिनिधी
राज्यभरात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या पुण्यातील कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत. त्यांनी ११ हजार ४० मतांनी भाजपाच्या हेमंत रासने यांचा पराभव केला. या निकालावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत विरोधक भाजपावर टीका करत आहेत. तसेच, ब्राह्मण उमेदवार नाही दिल्यानेच भाजपाचा पराभव झाला, ब्राह्मण समाज भाजपावर नाराज होता असंही बोललं जात आहे.Kasba byelection There is a big conspiracy to defame the Brahmin community Big statement of Chandrasekhar Bawankule Kasba
कारण, मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदारकीसाठी टिळक कुटुंबातील सदस्यही इच्छुक होते. परंतु भाजपाने त्यांना उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती. मात्र या सगळ्या चर्चा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी फेटाळल्या आहेत.
‘’सातत्याने जिंकणारे कधी तरी हारले तर…’’ कसबा पोटनिवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना फडणवीसांचा विरोधकांना टोला!
नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘’मी दाव्याने सांगतो ब्राह्मण समाजाने कधीही देश, देव, धर्म, संस्कार, संस्कृतीच्या विरोधात मतदान केलं नाही. कसबामध्ये सुद्धा ब्राह्मण समाजाचं एकही मत कमी झालं नाही.’’
याशिवाय ‘ब्राह्मण समाजाला बदनाम करण्यासाठी एक मोठं षडयंत्र होत आहे. त्यामुळे कुठल्याही ब्राह्मण समाजाने असं केलं नाही. आम्ही सांगतोय आम्ही कमी पडलो, आम्ही चार टक्क्यांनी कमी पडलो. लढण्यात कमी पडलो आम्ही यशस्वी झालो नाही. त्यामळे कुण्या समाजाने मतदान केलं नाही म्हणून यशस्वी झालो नाही का? त्यामुळे असा आरोप कुणी करू नये.’’ असंही बावनकुळे यांनी सांगितले.
https://youtube.com/shorts/wTbT2qccH-I?feature=share
ब्राह्मण समाज कधीही देश देव, धर्म, संस्कृती सोडून विचार करत नाही. कसबा मध्येही ब्राह्मण समाजाचे एकही मत कमी झाले नाही. pic.twitter.com/xpmH9SeijQ — Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) March 4, 2023
ब्राह्मण समाज कधीही देश देव, धर्म, संस्कृती सोडून विचार करत नाही. कसबा मध्येही ब्राह्मण समाजाचे एकही मत कमी झाले नाही. pic.twitter.com/xpmH9SeijQ
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) March 4, 2023
महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर हे मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते, त्यांची आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. रविंद्र धंगेकर यांना ७२ हजार ५९९ मतं मिळाली आहेत. तर हेमंत रासने यांना ६१ हजार ७७१ मतं मिळवता आली. मागील २८ वर्षांपासून कसबा मतदारसंघ हा भाजपाचा गड राहिला होता. यंदा मात्र तो काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे. धंगेकरांच्या विजयामुळे महाविकास आघाडीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App