कसब्याची पोटनिवडणूक देशाच्या बदलापर्यंत गेली, पण अखेरीस ती चंद्रकांतदादा – पवारांच्या शहाणपणापर्यंत खाली घसरली!!

चंद्रकांतदादांवर प्रश्न विचारताच पवार म्हणाले; शहाण्या माणसाबद्दल विचारा; पडळकर म्हणाले; पवार किती शहाणे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती!!

प्रतिनिधी

मुंबई : कसब्याची पोटनिवडणूक देशाच्या बदलाच्या वाऱ्यापर्यंत वर गेली, पण अखेरीस चंद्रकांतदादा पाटील आणि शरद पवार यांच्या शहाणपणापर्यंत खाली येऊन घसरली!! Kasba Byelection : sharad Pawar targets chandrakant patil, gopichand padalkar targets pawar

त्याचे झाले असे : शरद पवारांनी गेले दोन-तीन दिवस कसब्याच्या पोटनिवडणुकीतला भाजपचा पराभव हा विषय मराठी माध्यमांमध्ये जोरदार लावून धरला आहे. कसब्यातून झालेल्या परिवर्तनाची लाट देशातल्या बदलापर्यंत जाईल, असा पवारांचा दावा आहे. कसब्याचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर पवारांच्या भेटीला येऊन गेले. यावेळी घेतलेल्या आजच्या पत्रकार परिषदेत चंद्रकांतदादा पाटलांचा संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर शरद पवारांनी, मला जरा चांगल्या शहाण्या माणसाबद्दल प्रश्न विचारा, असे पत्रकारांना म्हणून असा चंद्रकांतदादांना चिमटा काढला.



याच मुद्द्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना प्रश्न विचारल्यानंतर शरद पवार किती शहाणे आहेत, हे सगळ्या जगाला माहिती आहे, असे उत्तर देऊन पडळकर यांनी पवारांचा शहाणपणा काढला. देशातली लोकशाही धोक्यात आल्याचा दावा शरद पवार यांच्यासह 9 नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात केला आहे. या मुद्द्यावर बोलताना पडळकर यांनी, शरद पवारांचा जनाधार घटला की त्यांना लोकशाही धोक्यात आल्याचा साक्षात्कार होतो. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून ते एकटेच पक्षाचे अध्यक्ष आहेत, तेव्हा लोकशाही धोक्यात येत नाही. पण सलग दुसऱ्यांदा जनमताच्या आधारावर मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर पवारांना लोकशाही धोक्यात आल्याचे दिसते, असा टोला पडळकरांनी पवारांना लगावला.

पण यानिमित्ताने कसब्याची पोटनिवडणूक देशातल्या बदलापर्यंत जाऊन पवारांनी ठेवली. ती अखेरीस चंद्रकांतदादा आणि खुद्द शरद पवार यांच्या शहाणपणावर येऊन घसरली आहे!!

Kasba Byelection : sharad Pawar targets chandrakant patil, gopichand padalkar targets pawar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात