विशेष प्रतिनिधी
बीड : Karuna Munde गत काही वर्षांपासून सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर टीका करणाऱ्या करुणा मुंडे शर्मा यांनी आज दीपावली पाडव्याच्या निमित्ताने त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. राजकारणात पोटचा नव्हे तर विचारांचा वारसा असतो. हे धनंजय मुंडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासारखेच तळागाळात जाऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. त्यांचा संघर्ष मी 2009 ते 2019 पर्यंत पाहिला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पराभवामागे त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांचा हात असल्याचाही आरोप केला.Karuna Munde
करुणा मुंडे शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचा दावा करतात. पण कायदेशीर वादामुळे त्या धनंजय यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. पण बुधवारी त्यांनी धनंजय मुंडे यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. बीड येथील ओबीसी महाएल्गार सभेत छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांचा उल्लेख गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार म्हणून केला होता. त्यांच्या या विधानाची राज्याच्या राजकारणात खमंग चर्चा रंगली आहे. त्यानंतर आता करुणा मुंडे यांनीही भुजबळांचे विधान 100 टक्के खरे असल्याचा दावा केला आहे.Karuna Munde
पंकजा नव्हे धनंजय मुंडे हेच खरे राजकीय वारस
करुणा मुंडे म्हणाल्या, छगन भुजबळ 100 टक्के बोललेत. राजकारणात पोटचा नव्हे तर विचारांचा वारसा असतो. आज ते धनंजय मुंडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. आमच्या घरामध्ये वाद झाला होता, पण धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासारखेच तळागाळात जाऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. मी 2009 ते 2019 पर्यंत त्यांचा संघर्ष पाहिला. त्यामुळे धनंजय हेच गोपीनाथ मुंडे यांचे खरे राजकीय वारस आहेत आणि त्यांची सून म्हणून मी सुद्धा. पंकजा मुंडे यांनी कितीही आपणच गोपीनाथ मुंडे यांच्या खऱ्या वारस असल्याचा दावा केला तरी तसे नाही. धनंजय हेच त्यांचे खरे राजकीय वारस आहेत.
धनंजय मुंडे यांनी आपले कर्तव्य पार पाडले
करुणा मुंडे यांनी यावेळी एक भाऊ म्हणून धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिल्याचाही दावा केला. त्या म्हणाल्या, पंकजा मुंडे यांच्या पराभवामागे भाजपचा हात होता. त्यामुळे पंकजा यांचे खच्चीकरण झाले. यामुळे त्या डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. पण त्यावेळी एक भाऊ म्हणून धनंजय मुंडे यांनी आपले कर्तव्य पार पाडले. त्यानंतर दोन्ही बहीण – भावाने एकत्रितपणे मंत्रिपदाची शपथ घेतली. धनंजय मुंडे व माझ्यात काही वाद नाही. त्यांच्या वृत्तीचा व माझा वाद आहे. आज एक नवीन पार्ट सुरू झाला आहे. मी माझी प्रॉपर्टी विकून, माझे मंगळसूत्र गहाण ठेवून या संघर्षाती सहभागी झाले होते.
नाचणारीला 20 कोटींचा स्टुडिओ बांधून दिला
उल्लेखनीय बाब म्हणजे करुणा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वीच मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती. धनंजय मुंडे यांनी जातीपातीचा मुद्दा, हिंदू – मुस्लिम व ओबीसी – मराठा वाद निर्माण करून राजकारण करत आहेत. स्थानिक निवडणुकीत रस्ते, नाले, वीज, पाणी, शेती, महिलांचे प्रश्न, रोजगार आदी मुद्दे हवेत. पण ते सर्व सोडून हे जातीचे राजकारण करत आहेत. समजाच्या नावावर मतदान घ्यायचे, पण समाजाच्या लोकांवर किती अन्याय झाला हे पाहायचे नाही. कारखान्याच्या सभासदांचे कोट्यवधी रुपये थकवणाऱ्यांनी मुंबईत मात्र नाचणाऱ्या महिलेला 20 कोटींचा डान्सिंग स्टुडिओ बांधून दिला. पण इकडे लोकांना कारखान्याचे पैसे मिळत नाहीत. वंजारी समाजातील लोकांची जमीन त्यात गेली. त्यांना न्याय मिळत नाही, असे त्या म्हणाल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App