Karnataka Election : कर्नाटकात राजनाथ सिंह यांचा काँग्रेसवर घणाघात; मुस्लीम आरक्षणाबाबत म्हणाले…

भारताच्या इतिहासात जर असा कोणताही पक्ष असेल की ज्याने… असंही राजनाथ सिंह म्हणाले आहेत.

विशेष प्रतिनिधी

बेळगाव : काँग्रेसने सत्तेत येण्यासाठी धर्माचा वापर केल्याचा आरोप करत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे, तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. Karnataka Election  Rajnath Singh criticizes Congress in Belgaum

कर्नाटकात सत्तेत असताना धार्मिक आधारावर चार टक्के आरक्षणाची व्यवस्था केल्याबद्दलही राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षावर टीका केली. हे केवळ मुस्लिमांच्या तुष्टीकरणासाठी करण्यात आल्याचे ते म्हणाले.

बेळगावी जिल्ह्यातील कागवाड येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले, “भारताच्या इतिहासात जर असा कोणताही पक्ष असेल की ज्याने सत्तेत येण्यासाठी ‘धर्माचा’ आधार घेतला असेल तर तो काँग्रेस आहे. काँग्रेस ‘हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन’चे राजकारण करते.’’, असा आरोप संरक्षणमंत्र्यांनी केला.

याशिवाय  “आर्थिकदृष्ट्या कमकुवत मुस्लीम आणि ख्रिश्चनांना आरक्षण दिल्यास आम्ही त्याचे स्वागत करू पण भारतीय राज्यघटना धर्माच्या आधारावर आरक्षणाला परवानगी देत ​​नाही.’’

Karnataka Election  Rajnath Singh criticizes Congress in Belgaum

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात