वृत्तसंस्था
द्वारका : बॉलीवूड मध्ये तडका स्ट्राइक दिल्यानंतर अभिनेत्री कंगना राणावतचा लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावण्याच्या इरादा आहे. kangana ranaut election news
‘तेजस’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्री गुजरात येथील द्वारका मंदिरात पोहोचली. अभिनेत्री देवाचे दर्शन घेऊन माध्यमांशी साधला. कंगनाने राजकारणातील प्रवेशाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. ‘जर श्री कृष्णाची कृपा असले तर लोकसभा निवडणूक लढवेन, असे म्हणाली.
कंगना तिच्या परखड मतांबद्दल प्रसिद्ध आहे. बॉलीवूडमधल्या अनेक प्रतिष्ठितांचे बुरखे तिने फाडले. इतकेच नाही तर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी पंगा घेण्याचे धाडस मुंबईत राहून दाखवले. त्यामुळे तिची राजकीय महत्त्वाकांक्षा फुलून आली. भाजपच्या नव्या समीकरणात तिच्यासारख्या अभिनेत्रीला स्थान असू शकते याची जाणीव तिला झाल्यानंतर तिने स्वतःहून लोकसभा निवडणूक लढवण्याचा इरादा व्यक्त केला आहे.
कंगना म्हणाली, ‘द्वारका नगरी फार दिव्य आहे. येथील प्रत्येक गोष्ट अद्भुत आहे. माझ्या हृदयात द्वारकाधीश आहेत. द्वारकाधीशाचे दर्शन झाल्यानंतर मला प्रसन्न वाटते. द्वारकाधीशचे दर्शन घेण्यासाठी नेहमी येथे येण्याचा प्रयत्न करते, पण ते शक्य होत नाही. सरकारने अशी सुविधा द्यावी की ज्यामुळे पाण्याखाली असलेली द्वारका पाण्यात जावून पाहाता येवू शकेल. भगवान श्रीकृष्णाची नगरी आपल्यासाठी स्वर्गापेक्षा कमी नाही!!
राम मंदिरवर काय म्हणाली कंगना??
राम मंदिरबद्दल कंगना म्हणाली, ‘600 वर्षांच्या संघर्षानंतर राम यांचा जन्म दिवस भारतीय वर्षात साजरा करण्याचा भाजप सरकारचा मानस आहे. मोठ्या थाटामाटात मंदिराची पुनर्स्थापना करू.
कंगना लवकरच ‘इमर्जन्सी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘इमर्जन्सी’ सिनेमात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या सर्वत्र या सिनेमाची चर्चा रंगत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App