विशेष प्रतिनिधी
मुंबई : Awhad-Padalkar राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड व सत्ताधारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात आज विधानभवनाच्या गेटवरच जोरदार बाचाबाची झाली. यावेळी आव्हाड यांनी पडळकर यांच्यावर गाडी अंगावर घालण्याचा आरोप केला. यामुळे या घटनेचे गांभिर्य वाढले आहे. विधानभवनाच्या गेटवरच हा प्रकार घडल्यामुळे तिथे मोठी गर्दी जमली होती.Awhad-Padalkar
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार तथा मुख्य प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी गत आठवड्यात विधिमंडळ परिसरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे पाहून ‘मंगळसूत्र चोरांचा’ अशी घोषणाबाजी केली होती. यामुळे पडळकर चांगलेच संतापले होते. या घटनेला 5 दिवस लोटत नाहीत तोच आज विधान भवनाच्या गेटवर या दोन्ही नेत्यांत पुन्हा बाका प्रसंग उद्धवला.Awhad-Padalkar
मी एकटाच आहे, कधीही ये -पडळकर
त्याचे झाले असे की, जितेंद्र आव्हाड विधिमंडळ प्रवेशद्वाराच्या जवळून पायी जात होते. त्यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांची गाडी थेट त्यांच्या दिशेने आली. यावेळी पडळकर यांच्या गाडीचा दरवाजा आपल्याला लागल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. त्याचा जाब त्यांनी पडळकरांना विचारला. यावेळी दोन्ही नेत्यांत चांगलेच वाक्युद्ध रंगले. मी एकटाच आहे. कधीही ये. तुझ्यासारखी अशी कुत्री घेऊन मी फिरत नाही, असे पडळकर यावेळी म्हणाले. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनीही त्यांना त्याच शब्दांत प्रत्युत्तर दिले. मी आयुष्यभर मुंबईत राहिलो. धमकी कुणाला देतो, असे ते म्हणाले.
माझ्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न – आव्हाड
जितेंद्र आव्हाड यांनी त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना पडळकरांनी माझ्या अंगावर गाडी आणल्याचा आरोप केला. मी मंगळसूत्र चोर म्हणालो होतो. त्याचा राग गोपीचंद पडळकर यांना का यावा? त्यांनी माझ्या अंगावर गाडी का आणली? त्यांनी माझ्या दिशेने गाडी आणली नसती तर हे प्रकरणच घडले नसते, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनीही पडळकर यांच्याविषयी बोलताना अत्यंत शिवराळ भाषेचा वापर केला.
हा काय बालिशपणा आहे. त्यांनी दरवाजाला लाथ मारली. त्यानंतर तो दरवाजा मला लागला. अशा छोट्या-मोठ्या गोष्टींकडे कोण लक्ष देते म्हणून मी पुढे आलो. मी आयुष्यभर मुंबईत राहिलो. पण ही कुठली पद्धत आहे? आमच्या अंगावर गाड्या घालायच्या? कोण ऐकूण घेणार? कशाला आमच्या अंगावर गाडी घालायची? व्हिडिओत दिसेलच काय झाले ते. यापूर्वीही असेच झाले होते. जाणिवपूर्वक खोड काढायची. तुम्हाला एवढा राग का येतो? तुम्हाला एवढे वाईट का वाटावे? असेही आव्हाड यावेळी बोलताना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App