विशेष प्रतिनिधी
मुंबई : Jitendra Avhad wife राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची पत्नी ऋता आव्हाड यांनी एका कार्यक्रमात खळबळजनक वक्तव्य करून दहशतवादी ओसामा बिन लादेन याची तुलना भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याशी केली. त्यावरून वाद उसळल्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते, विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ऋता आव्हाड यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. Jitendra Avhad wife osama bin laden comparison abdul kalam
ऋता आव्हाड यांनी मुलांना दहशतवादी ओसामा बिन लादेन यांचे चरित्र वाचण्यास सांगितले आणि ओसामा बिन लादेनची तुलना माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्याशी केली. नूर हाऊस मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात शिक्षणाचे महत्त्व या विषयावर त्या बोलत होत्या. Jitendra Avhad wife
ऋता आव्हाड म्हणाल्या, ओसामा बिन लादेन हा जन्मजात दहशतवादी नसून त्याला समाजाने तसे बनवले. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम जसे राष्ट्रपती झाले तसेच ओसामा बिन लादेन हे दहशतवादी झाले. त्यांना दहशतवादी होण्यास समाजाने भाग पाडले. निराशेतून ते दहशतवादी बनले. त्यांचे हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून विविध स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया येत आहे. मात्र काँग्रेस नेते ऋता आव्हाड यांच्या बाजूने उभे राहिले. Jitendra Avhad wife
Sambhji Raje : मनोजराव, आता कुणाला भेटू नका, विश्रांती घ्या; आठवडाभरात दुसऱ्यांदा भेटून संभाजीराजेंचा सल्ला!!
यावर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पुनावाला यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, दहशतवाद्यांना संरक्षण देणे इंडिया आघाडीच्या नेत्यांची सवय आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी इशरत जहाँ याचा बचाव केला तसेच इंडिया आघाडीतुन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सपाच्या नेत्यांनी याकूब, अफजल, सिमी, कसाब अशा दहशतवाद्यांचा बचाव केला आहे. इंडिया आघाडी व्होट मिळवण्यासाठी दहशतवाद्यांचे बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्याशी ओसामाची तुलना करणे चुकीचे आहे. असे शेहजाद पुनावाला म्हणाले. Jitendra Avhad wife
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App