नाशिक : मालेगाव बॉम्बस्फोटातले सगळे आरोपी निर्दोष सुटले. सोनिया गांधी प्रणित काँग्रेसचा हिंदू दहशतवादाचा narrative उद्ध्वस्त झाला. याबद्दलचा संताप काँग्रेस पेक्षा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जास्त उमटला. त्यामुळे तामिळनाडूचे वारे महाराष्ट्रात आणले आणि पवार बुद्धीचे शिलेदार सनातन हिंदू धर्माला शिव्या देऊ लागले, असे महाराष्ट्रात घडून आले.Jitendra avahad and Rohit Pawar abuse Sanatan Dharma
मालेगाव मध्ये बॉम्बस्फोट झाले त्याचे निमित्त करून हिंदू समाजालाच बदनाम करण्यासाठी हिंदू दहशतवादाचा narrative सोनिया प्रणित काँग्रेसने चालविला होता. पण तो narrative बॉम्बस्फोटाच्या खटल्याच्या निकालांनी नष्ट केला. सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता झाली त्यानंतर मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातले वेगवेगळे धागेदोरे समोर आले. सरसंघचालक मोहन भागवत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील त्यात गुंतवण्याचे प्रकार समोर आले. एक मोठे षडयंत्र उघड्यावर आले.
जितेंद्र आव्हाडांच्या शिव्या
या सगळ्याचे पडसाद काँग्रेसमध्ये उमटले. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे विवेक बुद्धी शाबूत असलेले नेते देखील बिथरले. त्यांनी सनातनी आणि हिंदुत्ववादी लोकांना दहशतवादी ठरविले. पण त्या पलीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जास्त पेटले. त्यांनी थेट सनातन हिंदू धर्मियांना शिव्या द्यायला सुरुवात केली. यात जितेंद्र आव्हाड आघाडीवर आले. त्यांनी जुना नसलेला इतिहास उखडून काढला छत्रपती शिवाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना महात्मा बसवेश्वरांना छळणारे सगळे सनातनीच होते. संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांना सनातन्यांनीच छळले. मुळात सनातन नावाचा धर्मच नव्हता आम्ही हिंदू धर्म मानणारे आहोत सनातनी दहशतवाद मान्यच केला पाहिजे, असे तारे जितेंद्र आव्हाड यांनी तोडले.
रोहित पवारांचे तारे
त्यांच्याबरोबर रोहित पवारांनी सनातन हिंदू धर्माला शिव्या दिल्या. आम्ही काल मनुस्मृति जाळली आज जाळतो उद्याही जाळू. नथुराम गोडसे आणि पहेलगाममधले दहशतवादी अति कडव्या विचारांचे होते. दहशतवादाला मूळात रंगच नसतो, असे तारे रोहित पवारांनी तोडले.
हे सगळे केवळ हिंदू आरोपी बॉम्बस्फोटाच्या खटल्यातून सुटले म्हणून घडले. पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तामिळनाडूतले राजकीय वारे महाराष्ट्रात आणले तामिळनाडू द्रविड मुन्नेत्र कळघमच्या नेत्यांनी सनातन धर्माला शिव्या दिल्या. त्यांच्यावर सुप्रीम कोर्टापर्यंत खटले लढले गेले. तामिळनाडू मध्ये सनातन विरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. पण त्यातून कुठलाही धडा न घेता पवारांच्या तामिळनाडूचे ते वारे महाराष्ट्रात आणून इथे अराजक माजवायचा डाव केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App