पवारांच्या राष्ट्रवादी प्रवृत्तीचे “संस्कार”; चव्हाट्यावर धुणी धुवायला आव्हाड विरुद्ध ठोंबरेंना व्हॉट्सअप चॅटचा आधार!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रवृत्तीचे सगळ्या महाराष्ट्राला दिसले “संस्कार”; जितेंद्र आव्हाड विरुद्ध रूपाली ठोंबरे यांचे चव्हाट्यावर धुणी धुवायला व्हॉट्सअप चॅटचा आधार!! हे सगळे संतोष देशमुख प्रकरणाच्या निमित्ताने घडले. jintendra awhad vs rupali thombare

संतोष देशमुख प्रकरणांमध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांना घेरण्यासाठी बीडमध्ये जो सर्वपक्षीय मोर्चा निघाला होता, त्या मोर्चासाठी दलित आणि मुस्लिमांना कसे आणायचे, त्यासाठी पैसा कसा कमी पडू दिला जाणार नाही, कोणाचे नेतृत्व त्यानिमित्ताने पुढे करायचे वगैरे मुद्द्यांवर जितेंद्र आव्हाड यांचे व्हॉट्सअप चॅट रूपाली ठोंबरे यांनी समोर आणल्याचे दिसले. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून ते शेअर केले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ निर्माण झाली. दलित आणि मुस्लिमांना बीडच्या मोर्चासाठी भरपूर संख्येने जमवा लागेल. तेवढा पैसा खर्च करा, वगैरे त्या चॅट मध्ये दिसले. ते सगळे संभाषण मोठे वादग्रस्त ठरले.

पण जितेंद्र आव्हाड यांनी मूळात ते व्हॉट्सअप चॅट आपले नसल्याचा दावा करत कानावर हात ठेवले. त्यांनी रूपाली ठोंबरे यांच्या विरोधात बीड पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी ती तक्रार नोंदवून रूपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला, पण रूपाली ठोंबरे त्यानंतर देखील आपल्या दाव्यावर ठाम राहिल्या. ते व्हॉट्सअप चॅट जितेंद्र आव्हाडांचेच होते, असे त्यांनी पुन्हा सांगितले.

त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन रूपाली ठोंबरे यांचे सगळे दावे खोडून काढले.

पण एकेकाळी हेच जितेंद्र आव्हाड आणि रूपाली ठोंबरे अखंड राष्ट्रवादी शरद पवार यांच्याच नेतृत्वाखाली एकत्र काम करत होते. आता जितेंद्र आव्हाड हे पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत, तर रूपाली ठोंबरे या अजितदारांच्या राष्ट्रवादीत आहेत. बीड मधल्या मोर्चाच्या निमित्ताने या दोन्ही नेत्यांमध्ये व्हॉट्सअप चॅटचे वॉर रंगले. पण त्या पलीकडे जाऊन पवारांच्या नेतृत्वाखालच्या या दोन “संस्कारी” नेत्यांमध्ये जोरदार भांडण जुंपल्याचे सगळ्या महाराष्ट्राला दिसले.

jintendra awhad vs rupali thombare

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात