वृत्तसंस्था
पुणे : अमेरिकेच्या जेबिल कंपनी पुणे जिल्ह्यात दोन हजार कोटींची गुंतवणूक करून प्रकल्प उभारणार आहे. रांजणगाव किंवा तळेगावमध्ये कंपनी प्रकल्पाचा विस्तार करणार आहे. Jebel’s project in Pune district, investment of Rs 2,000 crore; The state government will provide the land
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत कंपनीच्या प्रतिनिधींनी वेबिनारद्वारे चर्चा केली. या वेळी जेबिल कंपनीचे भारतातील प्रमुख डॅन वँग, डेसमाँड चेंग, सुधीर बालकृष्णन, व्हिक्टर मोनोरॉय, सुधीर साहू, पॅक्ट्रीक कॉनली यांच्यासह उद्योग विभागाचे सचिव बलदेव सिंग, एमआयडीसी सीईओ डॉ. पी. अन्बलगन आदी उपस्थित होते.
उद्योग विभागाचे सहकार्य
जेबिल कंपनीला प्रस्तावित प्रकल्पासाठी उद्योग विभागाकडून सर्व सहकार्य केले जाईल. रेडी शेड, जमीन व इतर सुविधा कंपनीला दिल्या जातील. या प्रकल्पामुळे गुंतवणूकवाढीला हातभार लागेल. रोजगार निर्माण होईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले.
इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मितीत जेबिल आघाडीवर
इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मितीत जेबिल कंपनी आघाडीवर आहे. स्मार्ट फोन, मोबाईलचे सुटे भाग, गृहोपयोगी वस्तू, अन्न व खाद्यपदार्थाचे वेष्टन निर्मिती आदी क्षेत्रात प्रकल्पाचा विस्तार करणार आहे. याद्वारे सुमारे दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक तर सुमारे 13 हजार प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App