प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेवरून भाजपला दिवस झाले पण राष्ट्रवादीला फक्त सर्वेक्षणात 11 % मते मिळाली या प्रश्नावर मात्र उत्तर देणे टाळले. Jayant patil targets BJP over popularity of eknath shinde, but avoid answering question on NCP 11% votes
महाराष्ट्रात जी न्यूज ने घेतलेल्या सर्वेक्षणात शिवसेना-भाजप युतीला 46 % मते मिळून 165 ते 185 जागांचे पूर्ण बहुमत मिळण्याचा निष्कर्ष काढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता 26.3 %, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता 23.6 % असल्याने राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपला डिवचले. एकनाथ शिंदे यांना जनतेचा वाढता पाठिंबा आहे याचा विचार भाजपच्या नेत्यांनी करायची वेळ आली आहे, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले.
पण त्याचवेळी याच सर्वेक्षणात राष्ट्रवादी काँग्रेसला फार मोठे फेरबदल केल्यानंतरही फक्त 11 % मते आहेत, या मुद्द्यावर मात्र उत्तर देण्याचे खुबीने टाळले. झी न्यूजच्या सर्वेक्षणात राष्ट्रवादी काँग्रेसला 11 % मते काँग्रेसला 15 % मते आणि ठाकरे गटाला 9 % मते मिळाली आहेत. तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीला 105 ते 118 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. याचा अर्थ महाविकास आघाडीला बहुमत मिळणार नाही. तरी देखील या महत्त्वाच्या मुद्याकडे जयंत पाटील यांनी सोयिस्कर दुर्लक्ष केले, पण एकनाथ शिंदे यांच्या पहिल्या क्रमांकाच्या लोकप्रियतेवरून भाजपला डिवचायचा प्रयत्न केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App