विशेष प्रतिनिधी
मुंबई : jayant patil मागच्या सात महिन्यांपासून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार अशी चर्चा होती. शनिवारी त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी सातारा जिल्ह्यातील विधान परिषदेवरील आमदार शशिकांत शिंदे यांची नियुक्ती शरद पवारांनी केली, अशा बातम्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर झळकल्या.jayant patil
रोहित पवारांनी तर त्याही पुढे जाऊन प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर पाटील ( jayant patil ) भाजपत जाणार नाहीत, असेही वक्तव्य करून टाकले. यानंतर काही वेळातच शरद पवारांचे निकटवर्तीय, विश्वासू अशी ओळख असलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी या विषयी संताप व्यक्त केला. पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा निव्वळ खोडसाळपणा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, माध्यमांनी केलेल्या दाव्यानुसार- पाटील म्हणाले की, १५ किंवा १६ जुलै रोजी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होत आहे. तत्पूर्वी शरद पवारांशी चर्चा करून राजीनाम्यावर निर्णय होऊ शकतो.
२०१९ पासून जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात तसे घडले नाही. अडीच वर्षांपूर्वी अजित पवारांनी महायुतीसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हाही पाटील दूरच राहिले. लोकसभेत शरद पवार पक्षाला घवघवीत यश मिळाले. त्याचे श्रेय शरद पवारांखालोखाल पाटील यांना मिळाले. विधानसभेचा निकाल लागण्याच्या आदल्या रात्री जयंत पाटील भावी मुख्यमंत्री अशा बातम्या पसरल्या होत्या. मात्र, प्रत्यक्ष निकालात शरद पवार गटाला सपाटून मार खावा लागला. फक्त १० जागांवर समाधान मानावे लागले. त्याचे खापर अनेक पदाधिकाऱ्यांनी तत्काळ पाटील यांच्यावरच फोडले. तेव्हापासून त्यांच्या पक्षांतराची चर्चा नव्याने सुरू झाली.
अजित पवार पक्षाची ऑफर
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रत्येकाने राज्य, देशहिताचे काम केले पाहिजे. अजित पवारांचे आमदार संग्राम जगताप म्हणाले की, येणार असतील तर जयंत पाटलांचे आम्ही स्वागत करू.
१० जून रोजी पक्षाच्या २६ व्या स्थापना दिन समारंभात जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली. त्या वेळी पवारांनी त्यांना काही दिवस थांबा असे म्हटले होते.
एक मंत्रिपद रिक्त ठेवले
महायुती सरकारने एक मंत्रिपद पाटील यांच्यासाठी राखीव ठेवले, असे म्हटले गेले. पण येतो, येतो म्हणत त्यांनी महायुतीला हुलकावणी दिली. तरीही अजित पवारांनी मंत्रिपद भरलेले नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App