प्रताप सरनाईकांच्या लेटरबाँम्बनंतर जयंत पाटलांनी शिवसेनेला लावले मधाचे बोट; म्हणाले राष्ट्रवादी – शिवसेना एकत्र लढतील…!!

प्रतिनिधी

मुंबई – शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपशी जुळवून घेण्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले. भाजपशी जुळवून घेण्यासंबंधींचे हे पत्र फुटल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेनेला मधाचे बोट लावले आहे. jayant patil hobnobs with shivsena says will contest elections in the allience

काँग्रेसने शेवटपर्यंत स्वबळाचा आग्रह धरला तर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेशी युती करून  निवडणूक लढवेल, असे जयंत पाटलांनी सांगितले. पाटलांनी काँग्रेसला अप्रत्यक्षपणे इशारा दिला. काँग्रेसने जर शेवटपर्यंत स्वबळाचा आग्रह धरला, तर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवेल. आघाडी पहिल्या स्थानावर असेल. काँग्रेसचे स्थान काय राहील सांगता येत नाही, असे जयंत पाटील म्हणाले.



तरीही जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्याबाबत आशावाद व्यक्त केला. ते म्हणाले, की नाना पटोले आणि भाई जगताप यांनी एकला चलो रे नारा दिला असला तरी आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. जेव्हा परिस्थिती येईल, तेव्हा आम्ही सगळे एकत्र लढू असे मला वाटते आहे. पण जर काँग्रेसने शेवटपर्यंत स्वबळाचाच आग्रह धरला, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जातील”, असे जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटलांनी काँग्रेसचा संदर्भ बोलण्यात घेतला असला, तरी त्यांचा इशारा शिवसेनेकडेच आहे. शिवसेना ही आघाडीतून फुटून निघणे हे राष्ट्रवादीला परवडण्यासारखे नाही. कारण शिवसेना – भाजप यांची युती पुन्हा जुळली, की राष्ट्रवादीचा सत्तेतला वाटा कायमचा जाईल, याची जयंत पाटील आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना पक्की जाणीव आहे. त्यामुळे त्यांनी प्रताप सरनाईकांचा लेटरबाँम्ब येताच शिवसेनेला मधाचे बोट लावल्याचे सांगितले जाते आहे.

jayant patil hobnobs with shivsena says will contest elections in the allience

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub