नाशिक : हो, नाही करता करता अखेर जयंत पाटलांनी 2633 दिवसांनी पद सोडले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा त्यांनी राजीनामा दिला. 2 खासदारांचा भाजप मोठा होऊ शकतो, तर आपला 10 आमदारांचा पक्ष का मोठा होऊ शकणार नाही??, असा सवाल विचारत त्यांनी नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. जयंत पाटलांच्या भाषणानंतर शरद पवारांनी शशिकांत शिंदे यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे सोपवली.
मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) अधिवेशनात शरद पवारांच्या समोर भाषण करताना जयंत पाटील थोडेसे हळवे झाले. गेल्या सात वर्षांमध्ये मी एकही दिवस सुट्टी घेतली नाही, बायकोलाही ते सांगितले. पक्षासाठी निष्ठेने काम करत आलो. पक्षात मी कुठलीही वेगळी संघटना काढली नाही फाउंडेशन काढले नाही वेगळा गट तयार केला नाही साहेब घेतील तो निर्णय मान्य केला त्यांच्या निर्देशानुसार काम करत आलो. साहेबांनी मला अध्यक्ष पदाची दोनदा संधी दिली. आता हीच योग्य वेळ आहे आपण बाजूला व्हायला पाहिजे मी साहेबांना विनंती करतो त्यांनी नवा अध्यक्ष निवडावा, असे जयंत पाटील म्हणाले.
2 खासदार निवडून आलेल्या भाजप मोठा होऊ शकतो तर 10 आमदार निवडून आलेला आपला पक्ष का मोठा होऊ शकणार नाही??, असा सवाल विचारत त्यांनी शशिकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. जयंत पाटलांनी प्रस्ताव म्हटल्यानंतर शरद पवारांनी तो मंजूर करून शशिकांत शिंदे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे सोपविली.
जयंत पाटलांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच मोठी दुफळी दिसून आली. खुद्द पवारांच्या घरातून परस्परविरोधी प्रतिक्रिया व्यक्त झाल्या जयंत पाटलांनी राजीनामा दिला नसतानासुद्धा आमदार रोहित पवारांनी त्यांच्या राजीनाम्याचे स्वागत केले होते, तर जयंत पाटलांनी अजून राजीनामा दिला नाही, असा खुलासा खासदार सुप्रिया सुळे यांना करावा लागला होता.
– शशिकांत शिंदे यांच्या पुढचे आव्हान
तसेही 2633 दिवस म्हणजे तब्बल सात वर्षे जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी होते. त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अखंड होती. परंतु प्रदेशाध्यक्षपद सोडताना ती दुभंगलेली आणि फक्त 10 आमदार निवडून आणायची क्षमता उरलेले शिल्लक राहिली होती. त्याचाच उल्लेख जयंत पाटलांनी आपल्या भाषणात केला. नवीन अध्यक्षांच्या नावाचा प्रस्ताव मांडताना त्यांच्यापुढे कोणते आव्हान असेल याचे सूतोवाच्या यातून त्यांनी केले. शशिकांत शिंदे यांना 10 आमदारांच्या पासून सुरुवात करून पक्ष मोठा करायचा, हे त्यांच्या लक्षात आणून दिले. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत आठ खासदार निवडून आले याची आठवणही त्यांनी करून दिली.
जयंत पाटलांना रामदास आठवले यांची ऑफर
जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांना महायुतीमध्ये येण्याची ऑफर दिली. मी मध्यस्थी करतो. त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत यावे, असे रामदास आठवले म्हणाले. रामदास आठवले यांच्या भाषणामुळे जयंत पाटलांच्या राष्ट्रवादी टिकण्यासंबंधी पुन्हा संशयाचे मळभ तयार झाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App