विशेष प्रतिनिधी
सांगली : Jayant Patil राज्यात आलेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीत झालेले नुकसान पाहून पुण्या-मुंबईत स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थीही चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी येत्या 28 सप्टेंबर रोजी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.Jayant Patil
जयंत पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यामुळे तसेच मराठवाड्यातील सध्याच्या पूर स्थितीमुळे अनेक गावे आणि शहरे पाण्याखाली गेली आहेत. वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचणे अवघड झाले आहे. या कठीण परिस्थितीत विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती परीक्षा देण्यासारखी नाही. त्यामुळे, आयोगाने विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा.Jayant Patil
येत्या २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसंदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. हवामान विभागाने दिलेला सतर्कतेचा इशारा व मराठवाड्यातील सध्याची पूरस्थिती अत्यंत गंभीर आहे. अनेक गावे, शहरे पाण्याखाली असून वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली आहे. या… — Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) September 25, 2025
येत्या २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसंदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. हवामान विभागाने दिलेला सतर्कतेचा इशारा व मराठवाड्यातील सध्याची पूरस्थिती अत्यंत गंभीर आहे. अनेक गावे, शहरे पाण्याखाली असून वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली आहे.
या…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) September 25, 2025
विद्यार्थ्यांवर अन्याय नको
जयंत पाटील यांनी पुढे असेही म्हटले की, पूर परिस्थितीमुळे जरी विद्यार्थ्यांनी तयारी केली असली तरी, अशा बिकट परिस्थितीत परीक्षा देणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेत समान संधी मिळायला हवी. त्यामुळे, आयोगाने बळजबरी न करता विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
दरम्यान, जयंत पाटील यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून माढा तालुक्यातील शेतीची पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी केली.
यावेळी जयंत पाटील यांनी रस्त्यांच्या बांधकामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सध्या सिमेंटचे रस्ते चुकीच्या पद्धतीने बनवले जात असल्याने पाणी जमिनीत मुरत नाही. तसेच, रस्त्यांची रचना चुकीची असल्यामुळे पुराचे पाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी योग्य प्रकारे वाहत नाही, ज्यामुळे पुराचा फटका बसतो, असे ते म्हणाले. अशा प्रकारच्या चुकीच्या डिझाइनमुळे १०० पेक्षा जास्त ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App