विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेल्या जयंत पाटलांनी काल मध्यरात्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे भेट घेतली. यासंबंधीची बातमी आज मराठी माध्यमांनी फोडली त्यानंतर जयंत वाटलांनी आपण “त्या” कारणासाठी नव्हे, तर “या” कारणासाठी बावनकुळे यांची भेट घेतल्याची कबुली दिली.
शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर जयंत पाटलांनी शरद पवार यांच्याबरोबरच राहणे पसंत केले. कारण त्यांना अपेक्षित असलेले जलसंपदा खाते भाजपने त्यांच्यासाठी सोडले नाही. यासंबंधीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. परंतु, आता जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खूपच अस्वस्थ आहेत. कारण त्यांचे बाकीचे सगळे सहकारी भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन आता दीड वर्ष होत आले, तरी जयंत पाटलांच्या हाती मात्र काही लागले नाही.
उलट जयंत पाटील ज्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्या पवारांच्या राष्ट्रवादीतच त्यांच्याच विरोधात वातावरण निर्मिती होत राहिली. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील केव्हाही भाजपमध्ये प्रवेश करणार अशा बातम्या माध्यमांमध्ये रंगल्या होत्या. त्याला जयंत पाटील यांच्याच गोटातून हवा देण्यात आली होती. कारण जयंत पाटील जे करतील ते आम्हाला मान्य असेल, अशा प्रतिक्रिया जयंत पाटलांच्या समर्थकांनी माध्यमांकडे व्यक्त केल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांनी काल चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. पण त्या भेटीची बातमी काल कुठे आली नाही. किंवा ती जयंत पाटलांनी देखील दिली नाही. उलट ती बातमी आज मराठी माध्यमांनी फोडल्यानंतर मात्र जयंत पाटलांनी त्या भेटीचा खुलासा केला. सांगली जिल्ह्यातल्या महसूल कामासंदर्भात बावनकुळे यांची भेट घेतली. त्यांना दहा-बारा निवेदने दिली. त्यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील तिथे होते. माझा स्टाफ माझ्याबरोबर होता. आमच्यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, असे जयंत पाटील म्हणाले. परंतु बातमी फुटल्यानंतर त्यांनी तो खुलासा केल्यामुळे त्यांच्या भोवतीच्या संशयाचे पडळ दूर झाले नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App