Jayant Patil सत्तेच्या वळचणीला यायची जयंत पाटलांची तडफड; त्यांच्याबरोबरच इतर “पवार संस्कारितांची” देखील तीच तगमग!!

नाशिक : सत्तेच्या वळचणीला यायची जयंत पाटलांची तडफड; त्यांच्याबरोबरच इतर पवार संस्कारितांची देखील तीच तगमग!!, हे चित्र महाराष्ट्रात सध्या समोर येऊन राहिले आहे.
विधानसभेच्या निवडणुका होऊन अवघे ५ महिने झालेत. उरलेले ५५ महिने विरोधी बाकांवर काढायचे या भीतीने सगळे “पवार संस्कारित” गर्भगळीत झालेत. एकीकडे ईडीची भीती आणि दुसरीकडे सत्तेचा ऑक्सिजन काढून घेतलेला, या दुहेरी कात्रीत सापडलेले शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उरलेसुरले 10 आमदार सत्तेच्या वळचणीला कसे आणि कुठून घुसता येईल हे पाहू लागलेत. त्यांचे नेतृत्व आता जयंत पाटील करत असल्याचे दिसून येत आहे.

जयंत पाटलांनी लोकमतच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली मुलाखत, त्याआधी बारामतीत शरद पवारांची घेतलेली भेट आणि कालच अजितदादा – जयंत पाटील यांच्यात झालेली बंद दाराआडची चर्चा, त्याच्याच आसपास झालेल्या राजकीय चर्चा यांचा सूत्रपात केला, तर जयंत पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत किती अस्वस्थ आहेत हे उघड दिसून आले. आता आम्ही कितीही हालचाली केल्या किंवा अन्य कुठले डाव टाकले, तरी पुढची पाच वर्षे तुमची सत्ता जात नाही हे आता सगळ्या लोकांना कळून चुकले आहे, कारण आमची संख्याच आता खूप कमी आहे, याची कबुली जयंत पाटलांनी या मुलाखतीतच देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर देऊन टाकली होती.

जयंत पाटलांचे सांगली जिल्ह्यातले विरोधक आणि भाजपचे आक्रमक आमदार गोपीचंद पडळकर यांनी तर अतिशय परखड शब्दात जयंत पाटलांचे वाभाडेच काढले. जयंत पाटील म्हणजे मोठ्या कासेची पण दूध चोरणारी गाय आहे. जयंत पाटलांना संघर्ष करता येत नाही. आपण सत्ता मिळवण्यासाठीच जन्माला आलोत असे त्यांना वाटते. त्यामुळे सत्तेसाठी कुठल्याही पातळीवर जाऊन लाचारी पत करायची त्यांची तयारी आहे. ते त्यांच्या इस्लामपूर वाळवा मतदार संघातून फक्त 11000 मतांनी निवडून आले त्यांच्याविरुद्ध तगडा उमेदवार असता तर ते पडले असते. 2024 च्या निवडणुकीत पडले नाहीत. आम्ही पुढच्या निवडणुकीत त्यांना पाडू, असे गोपीचंद पडळकर म्हणाले. याचा अर्थ जयंत पाटलांना केवळ पुढच्या 55 महिन्याची चिंता नसून त्यानंतरच्या निवडणुकीत आपण निवडून येऊ का नाही, याचीच मूळ चिंता लागून राहिल्याचे उघड झाले.



गोपीचंद पडळकर यांनी एवढी परखड टीका केल्यानंतर देखील जयंत पाटलांनी तितक्याच आक्रमकपणे अजून तरी उत्तर दिलेले नाही. कारण आपण सत्तेच्या वचळणीला केव्हाही जाऊन बसू भाजपकडून आपल्याला केव्हाही निरोप येईल, याची त्यांना आशा लागून राहिली आहे. पण जयंत पाटील भाजपच्या सत्तेच्या वळचणीला गेले तर ते एकटेच जातील अशी सुताराम शक्यता नाही. त्यांच्याबरोबर किंवा त्यांच्या आगे मागे प्राजक्त तनपुरे, आर. आर. आबा पाटलांचा मुलगा आमदार रोहित पाटील, खासदार निलेश लंके, आमदार संदीप क्षीरसागर आणि मनोज जरांगेंना हॉस्पिटलमध्ये जाऊन टाळ्या देणारे आमदार राजेश टोपे हे देखील सत्तेच्या वळचणीला जायला उत्सुक असल्याचे दिसून आले.

– नोटीसीच्या लपेट्यात सगळेच

पण भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आले म्हणून ईडी थांबली किंवा आधी केलेल्या पापांचा हिशेब भाजपवर घेणारच नाही याची कुठलीही गॅरेंटी नाही. याचे उदाहरण नाशिक जिल्ह्यातून समोर आले. नाशिक जिल्हा बँकेने कर्ज वाटपात घोटाळा केलेल्या सर्व पक्षांच्या आमदारांना सहकार आयुक्तांसमोर हजर राहण्याची नोटीस पाठवली. त्यामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना देखील सोडले नाही त्यांना एक कोटी 80 लाख रुपयांच्या थकबाकी साठी नोटीस पाठवली. त्यांच्याबरोबरच इतर आमदार खासदारांनाही त्या नोटीसीच्या लपेट्यात आणले.

Jayant Patil and other Pawar MLAs are eager to go with BJP power

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात