विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महिलेला अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप झाला. विरोधकांनी केलेल्या या आरोपांचे गोरे यांनी खंडन केले. 2017 च्या एका प्रकरणात कोर्टाने निर्दोष मुक्त केलं होतं, ते प्रकरण पुन्हा उकरून काढल्याचे ते म्हणाले. वडिलांच्या निधनानंतर अस्थिविसर्जनही करू दिलं नाही, विरोधकांनी खालच्या पातळीचं राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर हे आरोप केले. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापले. वडेट्टीवार आणि राऊत यांच्या आरोपानंतर मनोज जरांगे आणि अंजली दमानिया यांनी गोरेंवर कडाडून टीका केली. विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. याच सर्व आरोपांच्या, घटनांच्या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली.
विरोधकांनी केलेल्या या आरोपांचे गोरे यांनी खंडन केले आहे. 2017 च्या एका प्रकरणात कोर्टाने निर्दोष मुक्त केलं होतं, ते प्रकरण पुन्हा उकरून काढल्याचे ते म्हणाले. वडिलाच्या निधनानंतर अस्थिविसर्जनही करू दिलं नाही, विरोधकांनी खालच्या पातळीचं राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला. माझी बदनामी करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार आहे, असं जयकुमार गोरे म्हणाले.
जयकुमार गोरे म्हणाले :
2017 साली एक गुन्हा दाखल झाला होता. 2017 साली विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर पुन्हा नगरपालिकेची निवडणूक होती. त्या निवडणुकीच्या दोन दिवस आधी माझ्यावर एक गुन्हा दाखल झाला होता आणि त्यावर ट्रायल होऊन 2019 साली त्याचा निकाल लागला. त्याच निकालाची प्रत माझ्याकडे आहे, त्यामध्ये कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलं आहे. जप्त केलेला मुद्देमाल, मोबाईल हे नष्ट करण्याचा आदेश कोर्टाने त्याचवेळी दिला होता. आपली कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्याचा पुनरुच्चार करत विरोधकांनी सहा वर्षांपूर्वीचं हे प्रकरण पुन्हा उकरून काढले.
न्यायालयाने दिलेल्या निकालाला ( 2019) आता सहा वर्ष झाली आहेत. आज सहा वर्षांनंतर हा विषय पुन्हा समोर आला आहे. आपण कुठल्या वेळी कोणता विषय समोर आणावा, याबद्दल राजकीय नेत्यांनी मर्यादा ठेवली पाहिजे, असं मला वाटत. माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातल्या युवकाला, ज्या वडिलांनी कष्ट करून मोठं केलं, इथपर्यंत पोहोचवलं, त्यांच्या मृत्यूनंतर मला त्यांचं अस्थिविसर्जन सुद्धा करू दिलं नाही.
या घटनेचा कोर्टाने निकाल दिला आहे, पण या संदर्भात ज्यांनी ज्यांनी आरोप केला आहे, त्या प्रत्येकावर मी सभागृहात हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार असल्याचे गोरे यांनी नमूद केलं. त्या लोकांविरोधात बदनामीच खटला दाखल करून त्यांना कोर्टात खेचणार.
काय आहेत आरोप ?
जयकुमार गोरे यांच्यावर महिलेल्या फोटा पाठवल्याच्या प्रकरणावरुन गंभीर आरोप करण्यात येत आहेत. त्या महिलेला अद्याप त्रास देत असल्याचा आरोपही गोरेंवर केला जात आहे. मी त्या महिलेला त्रास देतोय की नाही या संदर्भात पोलिसांनी चौकशी करावी. जो कोण दोषी असतील, जे खोटं कुंभाड रचताहेत, या खोट्या भानगडी करत त्यांच्यावर कारवाई करावी असं आव्हान त्यांनी दिलं.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App