विशेष प्रतिनिधी
जालना : Jarange Patil मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात १० टक्के आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने दोन दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा सरकार उलथवून टाकू, असा अल्टिमेटम मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी सोमवारी दिला. आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी मुंबईत २९ तारखेपासून आपण व मराठा कार्यकर्ते बेमुदत उपोषण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.Jarange Patil
जालन्याच्या आंतरवाली सराटी येथील पत्रपरिषदेत ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण आर्थिकदृष्ट्या मागासांच्या १० टक्के कोट्यातून नाही, तर ओबीसी कोट्यातून आले पाहिजे. सरकारने आरक्षण दिले नाही तर मी सरकारही उलथवून लावीन. आंतरवाली सराटी सोडल्यानंतर मी कोणाचेही ऐकणार नाही, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आडमुठे असल्याची टीकाही त्यांनी केली.Jarange Patil
मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका; भाजपचा पलटवार
बीडमधील बैठकीत जरांगेंनी मुख्यमंत्र्यांच्या आईबद्दल अपशब्द वापरल्यावरून वादंग जरांगे असे बोलले असतील तर त्यांची जीभ हातात काढून देऊ.-आ. नितेश राणे
असे अपशब्द वापरणारी व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुयायी असू शकत नाही. – आ. प्रवीण दरेकर
मी असे बोललोच नाही, बोललो असेल तर शब्द मागे घेतो. आरक्षण द्या, तुमच्या आईचीसुद्धा पूजा करतो. – मनोज जरांगे
आम्हाला शांततेत आंदोलन करायचेय
जरांगे म्हणाले, आम्ही मुंबईत वाहतूक रोखणार नाही किंवा गोंधळ निर्माण करणार नाही. आंदोलन शांततेत पाहिजे. माझ्यासोबत येणाऱ्यांनी जाळपोळ करायची नाही. सरकारने आंदोलनात टोळी टाकल्याचा आरोपही त्यांनी केला. पण मराठ्याच्या पोरांना काठी जरी डिवचली तर पाणंद रस्तेसुद्धा ठेवू नका, असेही जरांगेंनी आंदोलकांना सांगितले. मराठा डॉक्टर, शिक्षक, वकील, शेतकरी, व्यापाऱ्यासह सर्वांनी सामील व्हावे.
आंतरवालीहून उद्या सकाळी निघणार
गणेश चतुर्थीच्या दिवशी बुधवार, २७ ऑगस्टला सकाळी १० वाजता जरांगे कार्यकर्त्यांसह आंतरवाली सराटीहून मुंबईकडे रवाना होत आहेत. या प्रवासात ते बुधवारी शिवनेरी येथे मुक्काम करतील. त्यानंतर २८ ऑगस्टला राजगुरुनगर, चाकणहून लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूरमार्गे सायंकाळी आझाद मैदानावर पोहोचण्याचे नियोजन आहे. २९ ऑगस्टला सकाळी १० वाजता ते आमरण उपोषण सुरू करणार.
आरक्षणाच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही : जरांगे
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, सगेसोयऱ्यांसाठीही आरक्षणाची अंमलबजावणी केली जावी, हैदराबाद, सातारा आणि बाॅम्बे गॅझेट लागू करावे, ५८ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया करावी, सरसकट गुन्हे मागे घ्या, बलिदान दिले त्यांना नोकऱ्या व आर्थिक मदत द्या, असे जरांगे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App