विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी अंतरवली सराटीत पुन्हा उपोषण सुरू केल्याच्या दुसऱ्याच दिवशी आरक्षणा विरोधात कोर्टाची लढाई लढणारे गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड झाली. या तोडफोडीच्या मुद्द्यावर जरांगे पाटलांनी हात झटकले, पण मराठा क्रांती मोर्चाने मात्र या संदर्भात वेगळी भाषा वापरली आहे. Jarange Patil – Maratha Kranti Morcha’s conflicting language over vandalism of Gunaratna Sadavarte’s car
आपले आंदोलन शांततामय मार्गाने पुढे सुरू आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या तोडफोडीशी आपल्या आंदोलनाचा संबंध नाही, असे वक्तव्य जरांगे पाटलांनी केले. उलट गुणरत्न सदावर्ते यांचे “श्रद्धेय” मराठा आरक्षणात अडकाठी आणत आहेत, असा आरोप करून जरांगे पाटलांनी संघ परिवारालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करणारे आंदोलन मराठा क्रांती मोर्चाचे नाहीत. पण त्यांच्या विषयी मराठा क्रांती मोर्चाला सहानुभूती आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत, असे मराठा क्रांती मोर्चाने नमूद केले आहे, तसेच सलमान खान आणि संजय दत्त यांच्या केस मधले वकील सतीश माने शिंदे हे स्वतःहून पुढे येऊन सदावर्ते यांची गाडी फोडणाऱ्या तीन युवकांची केस लढवणार आहेत.
गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडणाऱ्यांपैकी एक युवक छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील मंगेश साबळे हे आहेत. या युवकाने आधीच्या मराठा आंदोलनात अंतरवली सराटीत लाठीमार झाल्यानंतर त्याच्या निषेध करून स्वतःची गाडी पेटवली होती. मराठा क्रांती मोर्चाने त्या आंदोलनाचे समर्थन केले होते. आता देखील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या तोडफोडीचे समर्थन करून मराठा क्रांती मोर्चा मंगेश साबळे यांच्या पाठीशी उभा राहिला आहे.
शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा सुरू केली. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आज ते अन्नत्याग आंदोलन करून युवा संघर्ष यात्रेत सामील झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App