शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील कणकवली येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नीतेश राणे व संदेश सावंत यांच्या अटकपूर्व जामिनावर मंगळवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. प्रदीर्घ सुनावणीनंतर सरकारी वकिलांचा युक्तिवाद चालूच असल्याने या प्रकरणावर बुधवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.Jail or bail, Nitesh Rane’s pre-arrest bail hearing on Wednesday
विशेष प्रतिनिधी
ओरोस : शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील कणकवली येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नीतेश राणे व संदेश सावंत यांच्या अटकपूर्व जामिनावर मंगळवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. प्रदीर्घ सुनावणीनंतर सरकारी वकिलांचा युक्तिवाद चालूच असल्याने या प्रकरणावर बुधवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.
जिल्हा न्यायालयात दुपारी साडेतीन वाजल्यापासून सुरू झालेली सुनावणी सायंकाळी ७ वाजले तरी सुरूच होती. आमदार राणेंच्यावतीने ॲड. राजेंद्र रावराणे व ॲड. संग्राम देसाई, ॲड. उमेश सावंत यांनी अटकपूर्व जामीन मंजुरीसाठी जोरदार युक्तिवाद केला आहे, तर सरकारी पक्षातर्फे नीतेश राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यासाठी जोरदार युक्तिवाद करण्यात आला.
आमदार राणेंच्यावतीने युक्तिवाद करताना अॅड. संग्राम देसाई म्हणाले, संतोष परब हल्ला प्रकरणातील संशयितांची नावे पोलिसांनी गुप्त का ठेवली आहेत. राणेंना अटक करण्यासाठी ठाकरे सरकारकडून दबाव आहे. २४ आणि २५ डिसेंबरला आमदार नीतेश राणे आणि संदेश सावंत यांची चौकशी पोलिसांकडून करण्यात आली. मग आता पोलिसांना ताबा कशासाठी हवा आहे. हा सर्व ठरवून कट करण्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App