विशेष प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा शरद पवार यांनी मागे घेतल्याची पत्रकार परिषद घेताना अजित पवार उपस्थित नव्हते. यावरून ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र चार-पाच खुर्च्या असल्यामुळे पत्रकार परिषदेला येऊ नको असे शरद पवारांनीच आपल्याला सांगितल्याचा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे It was Sharad Pawar who stopped Ajit Dada from coming to the press conference
शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला अनुपस्थित का होता? असा प्रश्न विचारल्यावर अजित पवार पत्रकारावर चिडले. “ए… त्याबद्दल शरद पवारांनी सांगितलं आहे ना… पुन्हा, पुन्हा काय रे तेच ते… प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पी. सी. चाको आणि केरळचे आमदार तिथे उपस्थित होते. तसेच, पत्रकार परिषदेत चार-पाच खुर्च्या असतात. त्यामुळे शरद पवारांनी येऊ नका सांगितलं होतं,” असे ते चिडून म्हणाले.
अजित पवार म्हणाले, “शरद पवारांनी राजीनामा मागे घेतल्यावर सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. मी स्वत: ट्वीट करत प्रेसनोट काढली आहे. कालच शरद पवारांनी सांगितले, ‘माझा आणि पत्रकारांचा जास्त संबंध येत नाही’ कारण, मी कामाचा माणूस आहे.” याबाबत अजित पवारांची बाजू मांडताना शरद पवार म्हणाले होते की, काही लोकांना मीडियासमोर चमकण्याचा छंद असतो, तो अजितदादांना नाही.
काही लोकांना वृत्तपत्रांमध्ये नावे यावी यासाठी ते कामे करतात तर काही लोक फक्त कामे करण्यासाठी प्रसिद्ध असतात. अजित पवार हे मीडिया फ्रेंडली नाहीत हे सर्वांना माहिती आहे. मी देखील जेव्हा कोणी भेटते तेव्हा त्यांची चर्चा करतो याचा अर्थ असा नसतो की, त्या चर्चा राजकीय असतात. मात्र अजितदादा जेव्हा बोलतात, तेव्हा त्यांचा गैर अर्थ काढला जातो. माझी सर्वांना नम्र विनंती आहे की कृपया अजित दादांच्या बाबती चुकीची वृत्त पसरवू नका, असं पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App