प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात सत्तांतर नाट्यात घडलेल्या खळबळ जनक घटनांवर हा तर फक्त ट्रेलर आहे अजून मोठा “शोले” येणे बाकी आहे असे वक्तव्य भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केले आहे. शेलार यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात नवे तर्क वितर्क सुरू झाले आहेत.It just a big show trailer yet to come Excitement with Ashish Shelar statement
बुधवारी रात्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर गुरुवारी राज्याच्या राजकारणात एक धक्कादायक ट्विस्ट आला. भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद ऑफर करत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली. भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी घेतलेला हा निर्णय सर्वांनाच अनाकलनीय होता. या निर्णयामुळे देवेंद्र फडणवीस हे नाराज असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
असे असतानाच भाजपा आमदार आशिष शेलार यांनी एक मोठे विधान केले आहे. हा फक्त ट्रेलर असून राजकारणातला शोले अजून बाकी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आशिष शेलार यांच्या या विधानाने चांगलीच खळबळ उडाली आहे.
हा फक्त ट्रेलर…
देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी मिळून एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय केला. तसेच उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय सुद्धा दोघांनी मिळूनच केला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा स्वभाव आणि निर्णय तसेच अमित शहा, जे. पी.नड्डा आणि नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या हिताचा आहे. हा फक्त ट्रेलर आहे, महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा शोले येणं अजून बाकी असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.
हे डिमोशन नाही तर प्रमोशन
देवेंद्र फडणवीस हे पक्षनेतृत्वावर अजिबात नाराज नाहीत. हे फडणवीस यांचे डिमोशन नसून एका कार्यकर्त्याला त्याच्या समर्पण भावनेसाठी मिळालेलं प्रमोशन आहे. पक्षासाठी त्याग, समर्पण या गोष्टी करण्यासाठी सुद्धा नशीब लागतं. देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने भाजपाला असा नशीबवान नेता मिळाला ज्यांना ती संधी मिळाली आणि त्यात ते 100 पैकी 100 गुण मिळवून पास झाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App