प्रतिनिधी
मुंबई : खासगी कंपन्यांनी आपल्याकडे असलेल्या रिक्त जागांची माहिती कौशल्य विकास विभागाच्या वेबपोर्टलवर देणे बंधनकारक केले जाणार आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली आहे. It is mandatory for private companies to give information about vacancies on the skill development web portal
राज्यातील बेरोजगारी वाढत असून, शासनाकडे नोंदणी केलेल्या बेरोजगारांना रोजगार मिळत नसल्याबाबतचा प्रश्न काॅंग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री लोढा यांनी ही माहिती दिली.
नोकरीच्या उपलब्धतेची माहिती मिळावी म्हणून कौशल्य विकास विभागाने वेबपोर्टल सुरू केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार तरुण आपली नोंदणी करतात. तसेच, खासगी कंपन्या आपल्याकडील रिक्त जागांची माहिती या पोर्टलवकर देत नसल्याचे उघडकीस आले आहे. यासाठी सरकारकडून मोहीमही राबवण्यात आली.
मात्र, तरीही खासगी कंपन्यांचा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे आता खासगी कंपन्यांना या पोर्टलवर नोंदणी करुन आपल्याकडील रिक्त जागांची माहिती देणे बंधनकारक केले जाईल, असे लोढा यांनी स्पष्ट केले त्यामुळे सरकारी अथवा खासगी क्षेत्रात नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना कौशल्य विकास विभागाच्या वेब पोर्टलवर दोन्ही ठिकाणच्या संधींची माहिती एकत्रित उपलब्ध होणे शक्य आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App