कोरोना काळातही आयटी कंपन्यांची भरभराट, महसुलात दुपटीने वाढ होणार


मुंबई  : पुढील दोन वर्षे आयटी उद्योगाचा विकास वेगाने होईल आणि त्यांच्या महसुलातही दुपटीने वाढ होईल, असा विश्वा स विप्रो कंपनीचे संस्थापक अझीम प्रेमजी यांनी व्यक्त केला.IT industry will get huge profit in future

कोरोना काळातही आयटी कंपन्यांची भरभराट झाल्याने देशाच्या विकासातही या कंपन्या महत्त्वाचा वाटा उचलतील. देशाची अर्थव्यवस्था पाच अब्ज डॉलरपर्यंत नेण्यात आयटी कंपन्याचा वाटा महत्त्वाचा असणार आहे, असे अझीम प्रेमजी यांनी सांगितले.



कोरोनाकाळात लॉकडाउन असल्याने बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ केले. त्यामुळे कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढल्याने आयटी कंपन्यांना त्याचा चांगलाच फायदा झाला. त्या पार्श्वभूमीवर प्रेमजी यांनी आयटी कंपन्यांची भरभराट या वर्षातही कायम राहील, असा आशावाद व्यक्त केला आहे.

ते म्हणाले, लॉकडाउनमध्ये आयटी कंपन्यांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करून कामे ठप्प होऊ दिली नाही. त्यांचा पूर्ण कारभार सुरूच होता. त्यामुळे कोरोना काळातही आयटी क्षेत्राची वाढ कायम राहिली असून या कंपन्यांमुळे मोठ्या प्रमाणात तरुणांना रोजगारही मिळाला. ‘वर्क फ्रॉम होम’मुळे महिलांनाही काम करणे सोपे झाले.

IT industry will get huge profit in future

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात