‘थोबाड फोडा’ हा सुद्धा गुन्हा नाही काय ? केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा रोखठोक सवाल

वृत्तसंस्था

चिपळूण : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पदावर असताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्यांचे ‘थोबाड फोडा’ , असा आदेश काढला होता. तो सुद्धा गुन्हा ठरत नाही काय ? , त्यांच्यावर कोणता गुन्हा दाखल केला? असा रोखठोक सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. Isn’t ‘Thobad Foda’ also a crime? Union Minister Narayan Rane’s tough question

स्वातंत्र्य दिनाच्या इतिहासाची माहिती विचारणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांना मी जर तेथे असतो तर कानाखालीच लगावली असती, असे वक्तव्य राणे यांनी काल केले होते. त्यानंतर त्यांच्यावर नाशिक येथे गुन्हा दाखल करून अटक करण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारने सुरु केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राणे यांनी आज प्रथमच प्रतिक्रिया दिली.



ते म्हणाले,माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाला याची मला माहिती नाही, तक्रारदार सुधाकर बडगुजरला मी ओळखत नाही. नारायण राणे म्हणाले, माझं वक्तव्य हे धमकी नाही, मी जर तिथे असतो तर असं म्हटलं होतं. त्यामुळे तो गुन्हा होऊ शकत नाही. मी पण कॅबिनेट मंत्री आहे देशाचा. मी नॉर्मल माणूस वाटलो काय ? नाशिक पोलिस आयुक्त हे अटकेचे आदेश काढायला राष्ट्रपती आहेत की पंतप्रधान ? अशी विचारणाही राणेंनी केली.

आयुक्त काय म्हणाले

नाशिक पोलिस आयुक्त यांनी सविस्तर कायदेशीर प्रक्रिया सांगितली. संविधानानुसार गुन्हेगारी कायद्यांतर्गात राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना वगळता इतरांवर अटकेची कारवाई करता येते.

विविध कलमांतर्गत नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांचं विधान गंभीर आहे. त्याविरोधात तक्रार आली. तक्रारदारांची भावना दुखावल्याचं नमूद आहे. त्यामुळे नारायण राणेंना अटक करण्यासाठी पथक रवाना झाले आहे. कायद्याप्रमाणे सर्व गोष्टी होतील. राणेंना अटक करुन न्यायालयात हजर केलं जाईल, न्यायालय जो आदेश देईल त्यानुसार पुढील कारवाई होईल.

राणे हे राज्यसभेचे सदस्य आहेत. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष आहेत. त्यांना अटकेनंतर माहिती दिली जाईल. संबंधित जिल्हा दंडाधिकारी, न्याय दंडाधिकारी यांनाना माहिती दिली जाईल. राष्ट्रपती आणि राज्यपाल या दोघांवर संविधानात क्रिमिनल केसमध्ये अटकेची कारवाई करता येत नाही. बाकीच्यांना मुभा नाही. या केसमध्ये फॅक्ट ऑफ द केस पाहून ही कारवाई करण्यात येत आहे.

गुन्ह्याचं गांभीर्य पाहून माननीय साहेबांना पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून अटकेसाठी पथक रवाना झाले आहे. अटकेचे आदेश दिले आहेत. अटक करणे हा महत्त्वाचा भाग नाही, पुनरावृत्ती होऊ नये हे महत्त्वाचं आहे. राणेंनी आपलं निर्दोषत्व न्यायालयात सिद्ध करावं.

Isn’t ‘Thobad Foda’ also a crime? Union Minister Narayan Rane’s tough question

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात