प्रतिनिधी
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानांचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांसह शिंदे गटातील आमदारांनीही या विरोधात तीव्र प्रतिक्रिया देत निषेध नोंदवला आहे. Isn’t this an insult to Chhatrapati Shivarai?
राज्यकर्त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यपालांनी केलेला अपमान मान्य आहे का तो असेल तर उद्रेक होणारच, असा इशारा देणारे ट्विट राज्यसभेचे माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी केले आहे.
याच दरम्यान आता राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक जुना फोटो ट्विट केला आहे. हे ट्वीट चांगलेच चर्चेत आले आहे. आपल्या देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा हा अपमान नाही का?, असा सवाल देखील विचारला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद माजी आमदार प्रकाश गजभिये हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशात तत्कालीन विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना मुजरा करताना… आपल्या देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा हा अपमान नाही का??? pic.twitter.com/gN1GoAqrjb — Uday Samant (@samant_uday) November 27, 2022
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद माजी आमदार प्रकाश गजभिये हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशात तत्कालीन विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना मुजरा करताना…
आपल्या देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा हा अपमान नाही का??? pic.twitter.com/gN1GoAqrjb
— Uday Samant (@samant_uday) November 27, 2022
उदय सामंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद माजी आमदार प्रकाश गजभिये हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशात तत्कालीन विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना मुजरा करताना… आपल्या देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा हा अपमान नाही का???, असे मंत्री सामंत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
काय म्हणाले होते राज्यपाल?
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आमच्या शालेय जीवनात तुमचा आवडता हिरो कोण? आदर्श कोण? असे विचारले तर कोणी सुभाष चंद्र बोस, कोणी नेहरू असे सांगत. पण आता जर विचारले तुमचा हिरो कोण? आदर्श कोण? तर कोठे बाहेर जाण्याची गरज नाही. येथे महाराष्ट्रातच तुम्हाला हिरो मिळतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे झाले, डॉ. आंबडेकर ते गडकरी हे आजच्या युगाचे आदर्श आहेत,असे मत व्यक्त केले होते. त्यानंतर आता उदय सामंत यांनी जुना फोटो शेअर करत ट्विट केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App