वृत्तसंस्था
सांगली : इस्लामपूरचे ईश्वरपूर नामकरणाचा वाद आता आणखीच पेटला आहे. नामकरण बाजूलाच राहिले असून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत या मुद्यावरून आता तू तू मैं मैं सुरु झाली आहे. नामकरण करण्यासाठी बोलावलेल्या विशेष सभेला राष्ट्रवादीचे नगरसेवकांनी दांडी मारली होती. आता त्याच राष्ट्रवादींने पाच वर्षे झोपला होता का?, आत्ताच बरे नामकरण करायचे सुचतेय, अशा शब्दात शिवसेनेवर टीका केली आहे.Ishwarpur naming is remembered after five years; Was Shiv Sena asleep for so many years? ; Tick tock of the meeting
सभेला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दांडी का मारली ? याचे थेट उत्तर न देता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेवर थेट निशाणा साधला आहे. पाच वर्षे काय झोपला होता का ? निवडणुकीच्या तोंडावर नामकरण आठवत का? असा सवाल त्यांनी केला.
इस्लामपूर नगरपालिकेतील सत्ताधारी विकास आघाडी गेल्या ५ वर्षात इस्लामपूर शहरातील प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरली असून आता निवडणुकीच्या तोंडावर आपले अपयश झाकण्यासाठी त्यांनी इस्लामपूरच्या नामांतराचा प्रश्न पुढे केल्याचा आरोप शहाजीबापू पाटील यांनी केला. त्यांनी अगोदर आपले नगरसेवक सभागृहात हजर ठेवावेत. विकास आघाडीत मतैक्य नाही,त्याला आम्ही काय करणार? असा सवालही त्यांनी केला .
शिवसेनेने इस्लामपूर नामांतराचा प्रश्न उचलून धरत शहरात सह्यांची मोहीम राबविली आहे. शुक्रवारी नगरपालिकेत झालेल्या बैठकीस विकास आघाडीचे फक्त ९ नगरसेवकच हजर होते. या विषयावर शहाजीबापू पाटील यांनी भूमिका मांडली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App