नागपूरच्या ईश्वरी पांडेने पार केली पाल्कची समुद्रधुनी; जिद्द, धैर्य आणि अदम्य इच्छाशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण!!; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

Ishwari Pandey

विशेष प्रतिनिधी

नागपूर : दृष्टिहीन असतानाही अथांग सागरातील कठीण आव्हानांना धैर्याने सामोरे जात नागपूरची जलतरणपटू ईश्वरी पांडे हिने तब्बल 38 किलोमीटरची पाल्कची सामुद्रधुनी अवघ्या 11 तास 15 मिनिटांत पोहून पार केली. तिने आपल्या कौशल्याच्या जोरावर विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.Ishwari Pandey of Nagpur crossed the Palk Strait; An inspiring example of determination, courage and indomitable willpower!!

दृष्टिहीन असतानाही ईश्वरीने प्रचंड सराव केला. अनेक अडथळे पार करून तिने मोठे यश प्राप्त केले, त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.



 

ईश्वरीचे वडील कमलेश पांडे जिल्हा परिषदेत संगणक ऑपरेटर म्हणून काम करतात. घरची परिस्थिती सामान्य असतानाही प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने ही अभूतपूर्व कामगिरी साध्य केली. तिच्या या कर्तृत्वाचा महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला अभिमान आहे.

या देदीप्यमान यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास ट्विट करून जलतरणपटू ईश्वरी हिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Ishwari Pandey of Nagpur crossed the Palk Strait; An inspiring example of determination, courage and indomitable willpower!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात