विशेष प्रतिनिधी
मुंबई : ज्या व्यक्तीला झेड सिक्युरिटी आहे ती व्यक्ती अचानक गायब कशी होते. किरीट सोमय्या ‘मिस्टर इंडिया’ आहेत का गायब व्हायला असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी उपस्थित केला आहे.Is Kirit Somaiya ‘Mr India’? Question from Mahesh Tapase
महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर खोटेनाटे आरोप करून त्यांची बदनामी करणारे किरीट सोमय्या आज स्वतः नॉटरिचेबल आहेत हीच मोठी आश्चर्याची बाब आहे असेही महेश तपासे म्हणाले.
किरीट सोमय्या गायब झाल्यामुळे त्यांनी निश्चितच युद्धनौका ‘विक्रांत’च्या नावाने गोळा केलेले पैशांची अफरातफर केली ही शंका आता जनतेच्या मनात घर करून गेली आहे असा टोलाही तपासे यांनी लगावला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App