“मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प वेगाने मार्गी लावावेत,” फडणवीसांचे आदेश

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची पार पडली बैठक

विशेष प्रतिनिधी

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची 81 वी बैठक आज दुपारी सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. Irrigation projects in Marathwada should be speedily launched said Deputy Chief Minister Fadnavis

महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. एकूण 30 विषयांची चर्चा होऊन त्यास मंजूरी देण्यात आली. “मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प वेगाने मार्गी लावावेत,” असे आदेश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

याशिवाय उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत पुढील निर्देश दिले –

1) सात्रापोत्रा साठवण तलाव

2) रेपेवाडी साठवण तलाव

3) केंद्रवाडी साठवण तलाव

4) सिंदफणा प्रकल्प

5) विष्णुपुरी प्रकल्प

6) लेंडी प्रकल्प

7) कृष्णा मराठवाडा प्रकल्प तसेच नाशिक जिल्ह्यातील

8) वणी

9) जोरण या प्रकल्पातील उर्वरित कामांच्या अडीअडचणी सोडवून कामास गती द्यावी.

प्रकल्पबाधितांच्या पुर्नवसनविषयक अडचणी सोडविण्यासाठी लेंडी प्रकल्पातील क्षतिग्रस्त नागरी सुविधांसाठी सुमारे 31 कोटी निधीस मान्यता देण्यात आली, 44.05 कोटी अतिरिक्त दायित्वास मंजुरी दिली गेली. तसेच, कृष्णा-मराठवाडा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी निरा खोऱ्यातील पाणी भीमा नदीमध्ये आणण्यासाठी आवश्यक  341 कोटी रकमेस मान्यताही देण्यात आली.

याशिवाय गोदावरी मराठवाडा प्रदेशातील 125.97 कोटींच्या विशेष दुरुस्तीचे प्रस्ताव प्रशासकिय मान्यतेसाठी सादर करण्यास मान्यता दिली गेली आणि पश्चिम वाहिनी पार खोऱ्यातील पाणी गोदावरी नदीमध्ये आणण्यासाठी आवश्यक सर्वेक्षणासाठी 29 कोटीस मान्यताही या बैठकीत देण्यात आली.

Irrigation projects in Marathwada should be speedily launched said Deputy Chief Minister Fadnavis

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात