माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पकडण्यासाठी तपास यंत्रणांनी कंबर कसली; छापेमारीस सुरुवात

वृत्तसंस्था

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनी कंबर कसली आहे त्यांचा ठावठिकाणा मिळविण्यासाठी सक्तवसुली संचालनालय, (ईडी)  केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय)  कळविले असल्याचे वृत्त आहे. त्यांना पकडण्यासाठी सीबीआयकडून  विविध ठिकाणी छापेमारी केली जाण्याची शक्यता आहे. investigation agency start search for anil Deshmukh



मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी ईडीने पाच महिन्यांत चौकशीला हजर राहण्यासाठी पाच वेळा समन्स त्यांना बजावले होते. पण ते एकदाही हजर झाले नाहीत. सीबीआयने त्यांच्या कार्यालय व  घरावर पाचवेळा छापे टाकले आहेत. देशमुख यांनी कारवाई रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्यांना दिलासा मिळाला नाही. सीबीआय व ईडीकडून अटकेची कारवाई होण्याची शक्यता आल्यामुळे ते गुप्त ठिकाणी राहत आहेत. पण, कोठे याचा तपास सुरू केला जाणार आहे. त्यांना बारामतीकरांनी लपवून ठेवल्याचा आरोप होत आहे. ते नक्की कोठे लपले आहेत, याचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापे टाकले जाणार असल्याचे कळते. वरिष्ठांनी त्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्याने पुन्हा गतीने हालचाली करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

investigation agency start search for anil Deshmukh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात