‘’मुंबई महानगरपालिकेतील ८ हजार ४८५ कोटींच्या घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी करा’’ आशिष शेलारांनी मुख्यमंत्री शिंदेंना पाठवले पत्र!

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या डोळ्यासमोर ‘कट, कमिशन आणि कसाई’ हा गोरखधंदा सुरू होता, असाही आरोप केला आहे.

प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या कामांमध्ये २०१९ ते २०२२ दरम्यान झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्याची CrPC अंर्तगत SIT स्थापन करून चौकशी करावी, अशी मागणी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून केली आहे. याशिवाय, शेलारांनी उद्ध ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला आहे. Investigate the 8 thousand 485 crore scam in Mumbai Municipal Corporation through SIT Ashish Shelars letter to Chief Minister Shinde

‘’२८ नोव्हेंबर २०१९ ते ३१ ऑक्टोबर २०२२ दरम्यान मुंबई महापालिकेच्या ७६ कामांमध्ये ८ हजार ४८५ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले आहे. त्याची CrPC अंर्तगत SIT स्थापन करून चौकशी करावी, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.’’ अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे.

तर ‘’मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकण्याचा उद्योग उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली होत होता, त्याचे वर्णन ‘कट, कमिशन आणि कसाई’ असाच करावा लागेल.’’ असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

भगतसिंह कोश्यारींचा हेतू महापुरुषांचा अवमान करण्याचा नव्हता, तर समाजप्रबोधनाचा होता – मुंबई उच्च न्यायालय

आशिष शेलार यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले की ‘’ज्या मुंबई महापालिकेचं नेतृत्व उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे करत होते, त्याचं वर्णन एकच करता येईल कट, कमिशन आणि कसाई. हा गोरखधंदा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या डोळ्यासमोर, नाकासमोर, नाकाखाली सर्रासपणे मुंबईकरांचे खिसे कापत होता. निर्दयीपणे कारभार, एखादा कसाई करेल असा कारभार हा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी केला. मुंबईकरांचे जीव गेले, मुंबईकरांच्या खिशावर चाकू फिरवला. मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकला. म्हणून कट,कमिश आणि कसाई असा चित्रपट बनवावा अशा पद्धतीचा हा परिपाठ कॅगच्या रिपोर्टमध्ये दिसतो आहे.’’

याशिवाय ‘’मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून विनंती केली आहे, हे लेखापरीक्षण प्रकरण फक्त २८ नोव्हेंबर २०१९ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीतील कोविडच्या कामांना बाजूला काढलं, तर ७६ कामांच्या लेखापरीक्षणातून ८ हजार ८५ कोटींचा भ्रष्टाचार, घोटाळा झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे याची फौजदारी दंडसंहित अंतर्गत एसआयटी स्थापन करून चौकशी करावी.’’ अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Investigate the 8 thousand 485 crore scam in Mumbai Municipal Corporation through SIT Ashish Shelar letter to Chief Minister Shinde

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात