भागांचा वेगाने विकास होणार आणि मूलभूत सुविधा अधिक सक्षम करता येणार
विशेष प्रतिनिधी
मुंबई : MIDC villages मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एमआयडीसीच्या आढावा बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यांनी एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्यासंदर्भात धोरण तयार करण्याचे निर्देश दिले. ज्यामुळे त्या भागांचा वेगाने विकास होईल आणि मूलभूत सुविधा अधिक सक्षम करता येतील.MIDC villages
औद्योगिक क्षेत्राच्या वाढीसाठी औद्योगिक नगरीचा दर्जा दिल्यास या गावांच्या विकासाबरोबर पाणीपुरवठा, रस्ते, वीज आणि इतर पायाभूत सुविधा सुधारणे यावर भर दिला जाईल असे मुख्यमंत्री यांनी नमूद केले. बैठकीत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2025 अंतर्गत 63 करारांपैकी 47 उद्योग क्षेत्राशी संबंधित असून यातील कंपन्यांना जमीन वाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. नवीन औद्योगिक क्षेत्रांसाठी भूसंपादनाच्या अधिसूचना प्रकाशित केल्या जात असून ई-निविदा प्रक्रियेतून 654 भूखंडांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.
महामंडळाने 100 दिवस कृती आराखड्यात दिलेल्या उद्दिष्टांपैकी 2346 एकर औद्योगिक भूखंडांचे वाटप पूर्ण केले असून, भूसंपादनाचे 110 टक्के उद्दिष्ट गाठण्यात आले आहे. बुटीबोरी येथे 5 एमएलडी सांडपाणी प्रकल्प कार्यान्वित झाला असून, औद्योगिक सेवांशी संबंधित तक्रारी आणि मंजुरी अर्जांचे निराकरण करण्यात आले असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री उदय सामंत, प्रधान सचिव, सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App