नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर संशयाचे पडळ निर्माण झालेले शरद पवार महाराष्ट्र व्यापी दौऱ्यावर निघणार आहेत. त्यासाठी त्यांनी स्वातंत्र्य दिनानंतरचा दुसरा दिवस 16 ऑगस्ट हा राजकीय मुहूर्त निवडला आहे.Instead of West Maharashtra, Sharad Pawar is touring North Maharashtra, Marathwada
पण महाराष्ट्रव्यापी दौरा करताना शरद पवारांनी राजकीय चलाखी दाखवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्र यांनी ऑप्शनला टाकला असून पवार आधी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा दौरा करत आहेत. यातून पवार आपली ताकद आजमावून मग पश्चिम महाराष्ट्राकडे वळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अजित पवार हे राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या बालेकिल्ल्याला सत्तेची संजीवनी तर आपण त्या बालेकिल्लाला आपण धक्का लावायला नको असाही “राजकीय पोक्त” विचार पवारांनी केल्याचे त्यांच्याच अंतर्गत वर्तुळात बोलले जात आहे.
*त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातला आपला पक्ष अजित पवारांबरोबर सत्तेच्या वळचणीला गेलाच असेल, तर आपल्या दौऱ्याला अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही ही भीती देखील शरद पवार गोटाला वाटत आहे, हे यातून दिसून येते.म्हणूनच पवारांनी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा हे दोन विभाग आपल्या दौऱ्यासाठी सुरवातीला निवडले आहेत.*
रोहित पवारांचा चाचपणी दौरा
याखेरीज शरद पवारांच्या या दौऱ्याआधी आमदार रोहित पवार महाराष्ट्राचा चाचपणी दौरा करणार असल्याची बातमी समोर आली आहे. शरद पवारांनी ज्या शहरांमध्ये दौरा नियोजित केला आहे, त्या शहरांमध्ये आधी रोहित पवार भेट देतील. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पवारांच्या दौऱ्याचे नियोजन करतील. राष्ट्रवादीतले कोणते नेते आणि कार्यकर्ते आपल्या गटात उरले आहेत, त्यापैकी पवारांच्या दौऱ्याचे कोण व्यवस्थित नियोजन करू शकेल??, याची चाचपणी रोहित पवार करती आणि त्यानंतर शरद पवारांचा त्या शहरांमध्ये दौरा होईल.
बीड, धाराशिव दौरा
16 ऑगस्ट पासून शरद पवार दौऱ्यावर निघताना त्यांनी बीड आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांची निवड केली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पवारांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करण्याऐवजी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा हे दोन विभाग पहिल्यांदी निवडले, उत्तर महाराष्ट्रात त्यांनी छगन भुजबळांच्या येवल्याचा दौरा केला आणि आता ते धनंजय मुंडे यांच्या बीड आणि राणा जगजीत सिंह यांच्या धाराशिव जिल्ह्यात जाणार आहेत. पण तेथे आपले कोणते समर्थक उरले आहेत?? कोणते समर्थक अजित पवारांकडे गेले आहेत आणि जाऊ शकतात?? याची चाचपणी करायला मात्र शरद पवार आता रोहित पवारांना तिथे धाडत आहेत. रोहित पवारांचा चाचणी दौरा कसा होतो?? तिथे कशा प्रतिसाद मिळतो??, यावर शरद पवारांचा पुढचा दौरा अवलंबून असणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App