उपसा सिंचन योजनेतील कामे जून २०२४ पर्यंत पूर्ण करणार असल्याचेही जाहीर केले
विशेष प्रतिनिधी
धाराशीव : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांगरदरवाडी (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथे विकास तीर्थ कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाची पाहणी केली. पांगदरवाडी ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे उत्स्फूर्त स्वागत करत त्यांचा सत्कार केला. या प्रकल्पातील उपसा सिंचन योजनेतील कामे जून २०२४ पर्यंत पूर्ण करणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगताच गावकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी यंत्र पूजन केले. Inspection of Krishna Marathwada Irrigation Project by Deputy Chief Minister Fadnavis
याप्रसंगी आमदार राणाजगजितसिंह पाटील, प्रविण दरेकर, संभाजी पाटील-निलंगेकर, सुरेश धस, अभिमन्यू पवार, राजेंद्र राऊत आणि वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी सोबत होते.
९१ गावातील २५ हजार ७९८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार –
मराठवाड्याची तहान भागवण्याच्या दृष्टीने कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प महत्वाचा आहे. मात्र २००५ पासून या प्रकल्पाची केवळ चर्चाच चालू होती. अखेरीस देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना २०१९ मध्ये हा प्रकल्प सुरु केला. त्यानंतर मध्यंतरीच्या सरकारच्या काळात हा प्रकल्प अडीच वर्षे रखडला. मात्र भाजपा-शिवसेना सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा यात लक्ष घातले. डिसेंबर २०२२ मध्ये या प्रकल्पाला तब्बल ११७२६.१९ कोटी रुपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली.
प्रकल्प गतीने मार्गी लागण्यासाठी तात्काळ निविदा काढून उपसा सिंचन योजना क्रमांक १ व २ ची उर्वरीत कामे देखील सुरु करण्यात आली आहेत. यामुळे धाराशिव जिल्ह्यातील परांडा, भूम, वाशी, कळंब, धाराशिव या तालुक्यातील ३६ गावांना तर तुळजापूर, उमरगा, लोहारा तालुक्यातील ५५ गावांना पाणी मिळणार आहे. एकूण ९१ गावातील २५ हजार ७९८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच पिण्याचे पाणी व जनावरांसाठी पाणी उपलब्ध होणार आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या धाराशिव जिल्ह्यातील योजनांसाठी ५५९.७५ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App